थंडीच्या दिवसात ओठ फूटण्याचा त्रास अनेकांना होतो. ओठांचा शुष्कपणा कमी करण्यासाठी मलई, साजूक तूप यासारख्या घरगुती उपायांप्रमाणेच अनेकजण लिप बाम वापरतात. पण अनेकदा लिप लावल्यानंतर अगदी क्षणार्धातच पुन्हा ओठं सुकतात.मग पुन्हा पुन्हा लीप बाम लावले जातात. तसेच लीप बाम हे आजकाल अनेक फळांच्या फ्लेवरमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे त्याचे आकर्षणही अधिक आहे. मात्र अशाप्रकारच्या लीप बाममध्ये फळांच्या फ्लेवर्सप्रमाणे आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे काही घटकही असतात. त्यामुळे लीप बामचा फायदा होण्याऐवजी त्रासच अधिक होतो. म्हणूनच कॉस्मोलॉजिस्ट नंदीता दास यांचा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
सुगंध वाढवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ त्रासदायक ठरतात – ओठांना मुलायम ठेवण्यासोबतच आरोग्यदायी ठेवण्यासाठी योग्य लीपबामची निवड करा. लीप बाम विकत घेताना त्यामधील घटकांची यादी नीट वाचा. सुगंधी घटक मिसळलेले लीपबाम वापरणे कटाक्षाने टाळा. अनेकांना अशा घटकांमुळे अॅलर्जी होउउ शकते. तसेच ओठांवर विशिष्ट रिअॅक्शन आढळून येते. Cinnamates सारखे घटक लीप बाममध्ये असल्यास, त्यामुळे सुगंध वाढत असला तरीही अनेकांना त्यामुळे त्रासही होतो.
मेन्थॉलमुळे ओठ संवेदनशील होतात – मेन्थॉलमुळे तात्काळ थंडावा मिळतो. पण यामुळे ओठांचा शुष्कपणा कमी होत नाही. याउलट ओठांना अधिक त्रास होतो. ते अधिक संवेदनशील होतात. त्याऐवजी shea butter किंवा sealer सारखे घटक असणार्या कॉस्मॅटिक्सची निवड करा.
- टीप्स
लीप बाम निवडताना प्रामुख्याने त्यामधील SPF तपासून पहा. सनसक्रीनमधील zinc oxide घटक सूर्याच्या घातक किरणांपासून तुमचा बचाव होतो. तुमच्या लीप बाम मध्ये SPFनसल्यास मॉईश्चराईझिंग लीप बाम लावा त्यावर सनस्क्रीन लावा.
लीपबामऐवजी स्वयंपाकघरातील काही ताजे घटक वापरून ओठांना तजेलदार बनवा. याकरिता पुदीना आणि मध एकत्र करून ओठांना लावा.
- घरच्या घरी कसा बनवाल लीप बाम
तुमच्या आवशयकतेनुसार, / 1-2 चमचे पेट्रोलियम जेलीमध्ये मध आणि 3 थेंब पुदीन्याचा अर्क मिसळा.
काही सेकंदाकरिता ( 3 सेकेंदापेक्षा अधिक नाही) सारे मिश्रण गरम करा.
मिश्रण पातळ झाल्यानंतर एखाद्या डबीमध्ये साठवा.
रात्रभर हे मिश्रण सेटल होऊ द्यावे.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock