Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

दृष्टी अंधूक होण्यामागे असू शकतात ही ’14′कारणंं !

$
0
0

धुसर दिसणे म्हणजे थोडक्यात डोळ्यासमोरील चित्र स्पष्ट न दिसणे.कधी हा त्रास फक्त एकाच डोळ्याला तर कधी दोन्ही डोळ्यांमध्ये जाणवतो.कधी ही समस्या अचानक उद्धवते तर कधी हळूहळू याची जाणिव तुम्हाला होते.या समस्येची अनेक कारणे असू शकतात.तुम्ही जर सतत कम्प्युटर काम करत असाल तर डोळ्यांवर ताण आल्याने तुम्हाला धुसर दिसण्याची शक्यता आहे,त्याचप्रमाणे काही आजार व वृद्धपणामुळेही दृष्टी अंधुक होते.

जाणून घेऊयात कोणत्या आजारांमुळे होऊ शकते दृष्टी धुसर-

१. मायोपिया-

मायोपिया या विकारात जवळच्या गोष्टी व्यवस्थित दिसतात मात्र लांब असलेल्या गोष्टी अंधूक किंवा धुसर दिसू लागतात.सामान्यत: लहान मुलांमध्ये वयाच्या ८ ते १२ व्या वर्षी या समस्येचे निदान होते.मोठयांमध्ये जास्त वेळ कंप्यूटर वर काम केल्याने अथवा अती वाचनामुळे मायोपिया होण्याची शक्यता असते.कॉन्टॅक्ट लेन्स,चष्मा अथवा शस्त्रक्रिया करुन त्यावर उपचार करणे शक्य आहे.

२. मोतीबिंदू (कॅटरेक्ट)-

मोतीबिंदू मुळे डोळ्याच्या बुबुळांवर पातळ पडदा निर्माण होतो.मोतीबिंदू हा  हळूहळू वाढत जातो त्यामुळे सुरुवातीच्या काळात दृष्टीमध्ये फारसा फरक जाणवत नाही.मात्र काही काळानंतर धुसर दिसण्यास सुरुवात होते. मोतीबिंदू झाल्यास तीव्र प्रकाश सहन होत नाही,डोळ्यापुढे प्रकाशाची वर्तुळे तयार होतात त्यामुळे डोळे दुखू लागतात.एकच गोष्ट डोळ्यांना दुहेरी दिसते.मोतीबिंदू झाल्यास शस्त्रक्रिया करणे हा मार्ग योग्य असतो. जाणून घ्या मोतिबिंदूच्या या ’6′ लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करू नका

३. काचबिंदू(ग्लूकोमिया)-

काचबिंदू हा डोळ्यांतील नसांचा विकार आहे.डोळ्यांमधील नसा खराब झाल्यामुळे दिसणे कमी होते.एंगल-क्लोजर ग्लुकोमिया मध्ये सरुवातीला रुग्णाला डोळ्यांच्या कोप-यांमध्ये दिसणे कमी होते.त्यानंतर हळूहळू दिसणे पुर्णपणे बंद होते.काचबिंदू झाल्यास डोळे दुखणे,मळमळ,उलटी,डोळे लालसर होणे,प्रकाश सहन न होणे अशी लक्षणे जाणवतात.

डोळ्यांच्या विकाराप्रमाणे इतर काही विकारांमध्येही धुसर दिसू शकते-

४. मधूमेह-

मधूमेहाविषयी आपल्या सर्वांना पुरेशी माहीती आहेच.आजकाल प्रत्येक कुंटूबात  एखादी व्यक्ती मधूमेही असण्याची शक्यता असते.मधूमेहींना काही वर्षांनी दृष्टीबाबत समस्या निर्माण होऊ शकते जीला डायबेटीक मक्युलॉपेथी(Diabetic maculopathy)असे म्हणतात. डायबेटीक मक्युलॉपेथीचा परिणाम रुग्णाच्या डोळ्यांच्या रेटीनावर(पडदा) होतो.ज्यामुळे रेटीनामधील नसा दुखावल्या जातात व रेटीनाला सूज येते.ज्यामुळे धुसर दिसण्याची शक्यता वाढते.  जाणून घ्या मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !

५. कमी रक्तदाब-

जर तुमचा रक्तदाब अचानक ७० mg/dl पेक्षा खाली गेला तर तुम्हाला अंधुक दिसण्याची शक्यता असते.तुम्हाला मधुमेह असेल तर हायपोग्लायकेमिया(hypoglycaemia)किंवा वारंवार कमी रक्तादाबाचा त्रास होऊ शकतो.या मध्ये ह्रदयाचे ठोके अचानक वाढणे,अचानक मूड बदलणे,थकवा,डोकेदुखी,झोप न येणे,हात पायांना मुंग्या येणे,एकाग्रता कमी होणे या समस्या होतात. हे नक्की वाचा ‘बीपी लो’ झाल्यास करा हे प्रथमोपचार !

६. मिनी स्ट्रोक-

मिनी स्ट्रोक येताना देखील दृष्टी अंधुक होते.मिनी स्ट्रोकचा त्रास सुरु होताना मेदूंला रक्तपुरवठा कमी होतो.हा स्ट्रोक नसला तरी यासाठी डॉक्टरकडे जाणे अत्यंत गरजेचे असते.यामध्ये हात पाय बधीर होतात,थकवा येतो,तोल जातो,बोलताना त्रास होतो तसेच अचानक रक्तदाब वाढल्यामुळे बेशुद्ध होणे किंवा तात्पुरता स्मृतीभ्रंश होण्याची शक्यता असते.ज्यामुळे दृष्टी अंधुक होते.

७. ब्रेन एनेरीझम- (Brain aneurysm)

या मेदूंच्या विकारामध्ये मेंदुतील धमनी फुगते किंवा गोठते.ही एक जीवघेणी अवस्था असुन त्यामुळे मेंदूमध्ये रक्त जमा होते.याला हॅमरेजीक स्ट्रोक असे म्हणतात.यामध्ये डोक्यात तीव्र वेदना होऊ लागतात तसेच दूहेरी दिसणे,मळमळ,उलटी,कधी कधी बेशुद्ध होणे,प्रकाश सहन न होणे,मान जखडणे ही लक्षणे आढतात.

८. ऑटोएम्युन्स डिजीस-(Autoimmune diseases)

मेंदू आणि पाठीच्या कण्यात होणा-या Multiple sclerosis हा विकार,Myasthenia gravis,चेतातंतू व त्या स्नायूंना होणारे विकार तसेच Systemic lupus erythematosus या रोगप्रतिकार करणा-या शरीरातील पेशींच्या विकारांमध्ये देखील दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

औषधंं-

सतत एखाद्या आजारावर घेण्यात आलेल्या औषधांच्या दुष्पपरिणामामुळे अंधुक दिसू शकते.

९. एन्टीहिस्टमिन्स- (Antihistamines)

एलर्जीवर घेण्यात येणा-या एन्टीहिस्टमिन्स मुळे डोळ्यांवर ताण येतो ज्यामुळे तुम्हाला काचबिंदूची समस्या निर्माण होऊन धुसर दिसण्याची शक्यता असते.यासोबत डोळे दुखणे,डोकेदुखी,मळमळ,उलटी देखील होण्याची शक्यता असते.काचबिंदूचे ओपन एंगल व नॅरो एंगल ग्लुकोमिया हे दोन प्रकार असतात.नॅरो एंगल ग्लुकोमिया वर डॉक्टर तुम्हाला एन्टीहिस्टमिन्स बंद करण्याचा सल्ला देतात.

१०. कोर्टिको स्टिरॉइड-

कोर्टिको स्टिरॉइड(Corticosteroids)व विशेषत: प्रेडीनीसोलोन(prednisone) या औषधाच्या वापरामुळे अंधुक दिसण्याची शक्यता वाढते.संधिवात,अस्थमा,श्वासाचे विकार,आतड्यांचे विकार,सोरायसिस,व काही गंभीर एलर्जीच्या उपचारांमध्ये प्रेडीनीसोलोन चा वापर करण्यात येतो.या औषधाच्या वापरांमुळे डोळ्यांवर ताण येतो त्यामुळे मोतीबिंदू किंवा काचबिंदू होण्याची शक्यता असते.

११. मानसिक आजारांवरील औषधे-

antipsychotic drugs,chlorpromazine,thioridazine यासारख्या औषधांमुळे काही लोकांना मोतीबिंदू होण्याची शक्यता असते.विशेषत: thioridazine या औषधामधील विषद्रव्ये डोळ्यांच्या रेटीनामध्ये गेल्याने अंधुक दिसण्याची शक्यता वाढते.या औषधांमुळे रातआंधळेपणा होण्याचीही शक्यता असते.

१२.ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधे—

टेमोक्सिफीन या ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधामुळे देखील डोळ्याच्या रेटीनामध्ये बदल होतात व रंगांधळेपणा येतो.ब्रेस्ट कॅन्सरवर औषधे घेण्यास सुरुवात केल्यानंतर अथवा त्यानंतर कमीतकमी दोन वर्षांनंतर नियमित डोळ्यांची तपासणी जरुर करा.त्वचा किंवा स्वादूपिंडाच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये Isotretinoin चा वापर करण्यात येतो ज्यामुळे दृष्टी अंधुक होण्याची किंवा रातआंधळेपणा होण्याची शक्यता वाढते. जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरशी धैर्याने सामना करण्यासाठी खास ’10′ टीप्स !

१३. इरेक्टाइल डिसफंक्शन वरील औषधे-

वियाग्रा किंवा काही Erectile dysfunction वरील औषधांमुळे दृष्टी अंधुक होते.यासोबत प्रकाश सहन न होणे व डोळ्यासमोर निळसर छटा दिसण्याची देखील समस्या निर्माण होते.

१४. क्षयरोगावरील औषधे-Tuberculosis drugs

क्षयरोगासाठी वापरण्यात येणा-या Ethambutol व Isoniazid या औषधांमुळे मज्जातंतूच्या समस्या निर्माण होतात.ज्यामुळे कमी दिसणे,दृष्टी धुसर होणे किंवा विशिष्ठ रंगज्ञान न होणे या समस्या होतात. हे नक्की वाचा क्षयरोग – एक गंभीर मात्र आटोक्यात येणारा आजार !

याच प्रमाणे मायग्रेन व अशक्तपणा अश्या अनेक आजारांमुळे दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

दृष्टी दोषाचे कारण कोणतेही असले खालील लक्षणे आढल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या-

१.अचानक बेशुद्ध होणे किंवा शुद्ध हरपणे

२.बोलताना किंवा ऐकताना त्रास होणे

३.खुप ताप असणे

४.झटका येणे

५.एका बाजूने शरीर बधीर होणे अथवा अर्धांगवायू

६.स्मृतीभ्रंश

७.अचानक वजन कमी होणे

जर तुम्हाला अंधुक किंवा अस्पष्ट दिसत असेल तर दुर्लक्ष करु नका.वेळेत उपचार केल्यास तुमचे डोळे व आरोग्य दोन्हीही सुरक्षित राहू शकते.

Read this in English Translated By – Trupti Paradkar छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>