बाळासाठी प्रयत्न करताना पुरुषांमधील शुक्राणू आणि त्यांचा दर्जा हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात.स्खलनाच्या वेळी पुरुषांच्या टेस्टिकल्समधून वीर्य रुपात हे शूक्राणू बाहेर येतात.वीर्यामधील शूक्राणूंची संख्या व गुणवत्ता यावर पुरुषांची फर्टिलिटी अवलंबून असते.शूक्राणूंच्या हालचालीत असलेल्या वेगावरुन ते स्त्रीच्या अंडाशयापर्यंत पोहचण्यात यशस्वी होतात.ज्यामुळे पुढे गर्भधारणा होण्यास यश मिळते.
पुरुषांच्या वृषण(टेस्टीकल)मध्ये दिवसभरात लाखो स्पर्म तयार होतात.उत्सर्गाच्या वेळी कमीतकमी १.५ते ५ मिलीलीटर स्पर्म बाहेर पडतात.२०१० मध्ये WHO या जागतिक आरोग्य संस्थेच्या सर्वेक्षणानुसार सामान्यत: वीर्यामध्ये शूक्राणूंची संख्या १५ मिलीलीटर इतकी असते.मात्र यापेक्षा कमी संख्या असल्यास या समस्येला ओलीगोस्पर्मिया(oligospermia)असे
जाणून घेऊयात पुरुषांमधील स्पर्म काऊंट का कमी होतो-
१.वय-
वाढत्या वयोमानानूसार शुक्राणूंची संख्या व गुणवत्ता खालावते.ज्यामुळे त्यांच्यामधील फर्टिलिटी हळूहळू कमी होते.एका संशोधनानुसार जे पुरुष उशीरा बाळासाठी प्रयत्न करतात त्यांची मुले जन्माच्या वेळी शूक्राणूंची गुणवत्ता कमी झाल्याने हेल्दी नसतात.
२.जखम-
वृषण(टेस्टिकल्स)ला मार लागल्याने शुक्राणूंच्या गुणवत्तेवर काही परिणाम होत नाही मात्र शूक्रांणूंची निर्मिती करण्या-या पेशींना रक्तपुरवठा न झाल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते.
३.बॉडीबिल्डींगसाठी सप्लिमेंटस् घेणे-
शरीरसौष्ठवासाठी काही मुले तरुणपणी औषधे किंवा सप्लिमेंट्स घेतात.ज्याच्या परिणामांमुळे स्पर्म काउंट कमी होतो व त्यांच्यातील फर्टिलिटी ची क्षमता कमी होते.
४.उष्णता-
शुक्राणू अतीसंवेदनशील असतात.सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की जे लोक उष्ण प्रदेशात राहतात त्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची निर्मिती कमी होते.हॉट बाथटब,हॉटशॉवर तसेच जकुझी घेणा-या व घट्ट अंर्तवस्त्र घालणा-या पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत घट होते. जाणून घ्या आहारातील या ’5′ पदार्थांमुळे कमजोर होतात ‘शुक्राणू’ !
५.रेडीएशन-
एका संशोधनानूसार रेडीएशनच्या संपर्कात सतत काम करणा-या पुरुषांचा स्पर्म काउंट तर कमी होतोच पण त्यासोबत त्यांच्या स्पर्मची गुणवत्ताही ढासळते.यासाठी रेडीएशनच्या संपर्कापासून शक्य तितके दूर रहा.
६.स्मोकींग-
धुम्रपान करणे शरीरस्वास्थासाठी हानिकारक आहे.अती धुम्रपानामुळे वीर्यामधील केडमियम ची पातळी वाढते तर झिंकचे प्रमाण कमी होते.केडमियम शुक्राणूंमधील डीएनए कमी करतो तसेच यामुळे शुक्राणूंची संख्याही कमी होते.
७.अल्कोहोल-
अल्कोहोलच्या अतीसेवनाचा तुमच्या सेक्स करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो.एका संशोधनानुसार असे आढळले आहे की आठवड्यातून पाच वेळा मद्यपान करणा-या लोकांच्या शुक्रांणूंची संख्या व गुणवत्ता कमी होते.
८.ड्रग्ज-
मारिजूआना व कोकेन हे ड्रग्ज शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात.याचा विपरित परिणाम तुमच्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर व संख्येवरही पडतो.
९.ताण-तणाव-
कामाच्या ठिकाणी अती ताण-तणाव असल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या हॉर्मोन्सवर होतो.ज्यामुळे शुक्राणूंची निर्मिती कमी होते.एका संशोधनात तुमच्या जीवनातील सायकॉलॉजिकल स्ट्रेसचा परिणाम स्पर्मच्या संख्येवर व गुणवत्तेवर होतो असे आढळले आहे. जाणून घ्या शुक्राणू आणि पुरूषांच्या फर्टीलीटीबाबत जाणून घ्या ’6′ आश्चर्यकारक गोष्टी !
१०.प्रदूषण-
वातावरणातील प्रदूषणाचा देखील शुक्राणूंवर परिणाम होतो.यासाठी लीड,मर्क्युरी या केमिकल्स तसेच किटकनाशकांपासून दूर रहा.
११.औषधे-
काही ठराविक औषधांचा शुक्राणूंवर विपरित परिणाम होतो
१२.सोया प्रोडक्टस-
असे निर्दशनास आले आहे की अधिक प्रमाणात सोया प्रोडक्टस खाल्यास पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन कमी होते ज्यामुळे स्पर्मची क्वॉलिटी कमी होते.
१३.अविकसित टेस्टिकल्स-
पुरुषांचे त्यांच्या जन्माच्या तीन ते सहा महीन्यांनी टेस्टिकल्स विकसित होतात.पण काही कारणात्सव ते जर विकसित नाही झाले तर त्याचा परिणाम शुक्रांणूच्या क्षमतेवर पडू शकतो. हे नक्की वाचा शुक्राणूंचा दर्जा आणि संख्या वाढवण्यास मदत करतील हे ’6′ पदार्थ
१४. लठ्ठठपणा -
अती जाडपणामुळे स्त्री व पुरुष या दोघांचीही प्रजनन क्षमता कमी होते.पुरुषांमध्ये जाडपणाचा परिणाम शुक्रांणूंच्या संख्येवर होतो.
१५. मधूमेह-
एका संशोधनासूसार मधूमेह स्पर्ममधील डीएनए साठी हानिकारक ठरतो.तसेच मधूमेहामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर व हालीचालीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
१६.सेक्सच्या संबधित आजार-
सेक्सच्या संबधित आजारांमुळे स्पर्मच्या संख्येवर विपरित परिणाम होतो.याचा थेट परिणाम त्यांच्या डीएमए वर देखील होत असतो.
१७.गंभीर आजार-
काही आजारांमुळे पुरुषामधील टेस्टोस्टेरॉन ची पातळी कमी होते.अशावेळी त्याचा परिणाम स्पर्मच्या क्वॉलिटीवर होतो.काही रुग्णांमध्ये स्पर्म निर्मिती जवळजवळ बंदच होते.
स्पर्मची गुणवत्ता कशी सुधारावी-
यासाठी योग्य व संतुलित आहार घ्या.आहारात झिंक व व्हिटामिन बी ६ चे प्रमाण वाढवा.ज्यामुळे तुमच्या शुक्राणूंची संख्या वाढेल.अंडी,मासे आणि स्टॉबेरी मध्ये झिंक मोठ्या प्रमाणावर आढळते.यासाठी या पदार्थांचे नियमित सेवन करा.यासोबत अक्रोड मधील ओमेगा ३ मुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेत चांगली वाढ होते.स्पर्मची गुणवत्ता सुधारण्यासाठी टोमॅटोमधील लायकोपेन लाभदायक ठरते.धुम्रपान,मद्यपान व ड्रग्ज पासून दूर रहा. स्वत:ला ताण-तणावापासून मुक्त करण्यासाठी रोज नियमित व्यायाम करा.ज्यामुळे वजन नियंत्रित राहते व तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock