शरीराचे द्खणे हे आबालवृद्धांमध्ये सर्रास आढळणारे एक दुखणे आहे. यामध्ये डोकेदुखी, मानेचे दुखणे, पाठीचे दुखणे, स्नायूंचे दुखणे तसेच सांधेदुखी प्रामुख्याने आढळते. तर चेतासंस्थेत बिघाड झाल्यास ‘न्युरोपॅथिक’ दुखणेदेखील अनेकांमध्ये आढळते. या दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. म्हणूनच शरीराच्या या काही दुखण्यांकडे दुर्लक्ष करणे टाळू नका.
शरीराचे दुखणे हा काळजीचा विषय केव्हा होतो ?
अनेकजणांमध्ये तापात स्नायूंचे आणि सांध्यांचे दुखणे वाढते. पण या सर्रास आढळणार्या दुखण्यासोबतच खालील लक्षणांकडे मूळीच दुर्लक्ष करु नका.
- ताप
- सांधेदुखीचा त्रास अचानक वाढणे
- स्नायूंचे दुखणे
- अंगदुखीमुळे झोप कमी होणे
- शारिरीक कमजोरी किंवा आजारपणामुळे आलेला मलूलपणा
काही आजारांमुळेदेखील हा त्रास वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्याचे वेळीच निदान आणि उपचार होणेदेखील गरजेचे आहे. असेच काही आजार म्हणजे ….
1) फाइब्रोमायोजिया (Fibromyalgia)
या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे अंगदुखी, थकवा, तसेच वारंवार होणारी झोपमोड यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
लक्षणं -
- सकाळच्या वेळेस शरीर आखडणे
- नैराश्य
- चिंता करत राहणं
- सूज
- मायग्रेन
- जबडा आखडणे तसेच तेथील स्नायूंचे दुखणे
- पोट बिघडणे
- मुत्राशयाजवळ दुखणे
- प्रोस्टेट ग्रंथींचे दुखणे
म्हणजे तुम्हांला फाइब्रोमायोजिया त्रास असल्यास यापैकी एक किंवा अधिक लक्षणं आढळण्याची शक्यता आहे.
उपचार -
वरील लक्षणं सामान्य वाटत असली तरीही अधिककाळ त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यावा. तसेच या आजाराचे निदान झाल्यास तुम्हांला काही अॅण्टीडीप्रेसंट औषधं तसेच वेदनाक्षामक औषधं दिली जातात. याबरोबरीनेच फिजिकल थेरपी, योग्य व्यायाम, संतुलित आहार व काही योगासनांनी मात करा.
2) क्रोनिक फटिग सिंड्रोम (chronic fatigue syndrome)
हा आजार फाइब्रोमायोजिया प्रामाणेच असतो. पुरेशी विश्रांती घेऊनदेखील तुम्हांला थकवा जाणवत असल्यास हा चिंतेचा विषय आहे. हे क्रोनिक फटिग सिंड्रोमचे लक्षण आहे.
3) लाइम डिसिजेस (Lyme disease)
हा आजार ‘ब्रोरेलिया बर्गडोरफेरी’( Borrelia burgdorferi ) या बॅक्टेरियामार्फत पसरतो. याच्या दंशामुळे हा आजार पसरतो.
लक्षण -
- अति थकवा
- तीव्र डोकेदुखी
- स्नायूंचे दुखणे
- सांध्यात दुखणे
- संवेदना नाहीशा होणे
- एकाग्रता न होणे
- स्मृतीभ्रंश
- वारंवार झोपमोड होणे
उपचार -
तुम्हांला या बॅक्टेरीयाचा दंश झाल्याचे वेळीच समजल्यास तुम्ही अॅन्टीबायोटिक्सनी यावर मात करू शकता. मात्र त्याची गंभीरता वाढल्यानंतर तुमच्या लक्षात आल्यास वरील लक्षणं आढळतात. यामुळे हृदयाची धडधड वाढणं, तीव्र डोकेदुखी होणं या सोबतच डोळे लाल झाल्याचे आढळल्यास तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे जाणेच हितावह आहे. अशावेळी तुम्हांला हा दंश एखाद्या झाडा-झुडपाजवळ झाल्याचे समजावे.
4) ताण
ताण-तणाव हे अंगदुखीचे एक प्रमुख आणि सामान्य कारण असले तरीही त्याकडे दुर्लक्ष करू नका.
लक्षण -
- डोकेदुखी
- स्नायूंचे दुखणे
- छातीत दुखणे
- थकवा
- झोपेचे विकार
- पोट बिघडणे
तुम्ही ताण-तणावापासून दूर राहूनदेखील ही समस्या वाढत असल्यास, किंवा ताण-तणाव तुमच्या दुखण्याचे कारण नसल्यास डॉक्टरांचा सल्लाअ नक्की घ्या.
5) ‘व्हिटॅमिन डी’ ची कमतरता
सतत अंगदुखीचे एक कारण म्हणजे शरीरात असलेली ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता. कॅल्शियम शोषून घेण्यासोबत व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत करते. व्हिटॅमिन डी मुळे शरीर आहारातून 10-15% कॅलशियम अधिक शोषून घेते. त्यामुळे जेव्हा आहरात त्याची कमतरता निर्माण होते त्यावेळी शरीर कमजोर होऊन थकवा वाढतो.
लक्षणं-:
- थकवा
- हाडांचा ठिसुळपणा
- कमजोरी
उपचार :
चाचणीमध्ये ‘व्हिटॅमिन डी’ची कमरता आढळल्यास तुम् डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘व्हिटॅमिन डी ‘ सप्लिमेंट गोळ्या व संतुलित आहार घेऊ शकता.
6) ‘आयर्न’ची कमतरता
शरीरात आयर्नची कमतरता आढळल्यास ‘अॅनिमिया’ जडण्याची शक्यता असते. यामुळे रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाणही मंदावते. तसेच पोषणद्रव्यांच्या शरीराला पुरेसा पुरवठा न झाल्यास शरीराचे दुखणे वाढते.
लक्षण -
- स्नायूंचे दुखणे
- निस्तेज त्वचा आणि नखं
- मासिकपाळीच्या काळात अतिरिक्त रक्तस्त्राव होणे
- रुक्ष केस
- सतत मूड बदलणे, चिडचिड होणे
उपचार -
आयर्नची कमतरता कमी करण्यासाठी काही औषधं आणि गोळ्या उपलब्ध आहेत. पण या सोबतच पुरेसा आणि संतुलित आहार घेणेदेखील गरजेचा आहे. या ’7′ पदार्थांनी वाढवा तुमचे आयर्न !
7) मल्टीपल स्केलॉरसिस
या आजारामध्ये तुमच्या पाठीचा कणा आणि मेंदूचे कार्य बिघडू शकते. यामुळे अंगदुखीचा त्रासही सतत उद्भवतो.
लक्षणं -
- थकवा
- ज्ञानेद्रियामधील संवेदना कमी होणे
- धुरकट दिसणे
- स्नायू आखडणे
- मूत्र विसर्जन करताना त्रास होणे
उपचार -
या आजारामध्ये वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. यामुळे आजारवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.
8) आस्टीओआर्थ्राइटिस (Osteoarthritis)
हा संधीवाताचा एक प्रकार आहे. यामध्ये हाड एकमेकांवर घासल्याने वेदना होतात. हे प्रमाण वाढल्यास अंगभर हे दुखणे पसरते आणि थकवा जाणवतो.
लक्षण -
- सांध्यांमध्ये वेदना आणि सूज
- पाठीत, कंबरेत आणि हातांमध्ये वेदना होणे, हालचाल करणं कठीण होणं
- सकाळच्या वेळी हात-पाय आखडणे
9) नर्व्ह डॅमेज (Nerve damage) -
हा आजार एखाद्या आघात किंवा इजेमुळे बळावण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये चेतासंस्थेला आघात झाल्याने त्याचे कर्य बिघडते. परिणामी वेदना शरीरभर पसरतात.
लक्षणं
- स्नायूंचे दुखणे
- समन्वय राखता न येणं
10) इतर आजारांमध्ये आढळणारी लक्षणं
- लूपस
- संधिवात
- पोटात जळजळ होणे
- ताप
- टीबी (as per doctors from All India Institute of Medical Sciences)
- कर्करोग
- अपघातांमध्ये झालेल्या जखमा थंडीच्या दिवसात अधिक दुखतात.
- सततचे व दीर्घकालीन दुखणे.
- वाढत्या वयासोबत अंगदुखीचा त्रास अधिक वाढतो.
काही आजारांमध्ये अंगदुखी प्रामुख्याने आढळते. तसेच हे दुखणे काही आजारांचे प्रमुख लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अन्यथा आजारांची गंभीरता वाढल्याने मृत्यू होण्याचाही धोका असतो.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Sourece - 10 reasons you shouldn’t ignore constant body ache
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.