किडनी विकार सध्या अगदी लहान मुलांमध्ये देखील आढळतात.ह्रदयविकार,फुफ्फुसे आणि यकृताच्या विकारांप्रमाणे किडनी विकाराची लक्षणे सुरवातीपासूनच दिसत नाहीत.किडनीचे कार्य ८० टक्के निकामी झाल्यानंतर या विकारांचे निदान होते.विकार बळावल्याने पुढे अधिक गंभीर समस्या निर्माण होतात.यामुळे किडनी विकाराबाबत आधीच काळजी घेणे गरजेचे असते.
के.जे.सौमय्या मेडीकल कॉलेज आणि रिसर्च सेंटरच्या Pediatrics आणि Neonatology Department च्या Pediatric Nephrolgy Division मधील प्रोफेसर व हेड इनचार्ज डॉ.वर्षा फडके यांच्या सल्ल्यानुसार लहान मुलांच्या किडनी विकारांबाबत सर्व माहिती पालकांकडे असणे गरजेचे आहे.
लहान मुलांच्या किडनी विकारातील काही महत्वाची लक्षणे-
१. लघवी करताना जळजळ होणे.
२. लाल/ब्राऊन लघवी असणे.
३. लघवीचे प्रमाण कमी असणे.
४. दिवसभरात चार पेक्षा कमी वेळा लघवी होणे.
५. दिवसभरात १२ वेळापेक्षा अधिक वेळा लघवी होणे.
६. डोळ्यांभोवती सूज येणे.
७. वाढ खुंटणे किंवा हाडांमध्ये विकृती असणे.
८. प्रमाणापेक्षा अधिक तहान लागणे.
नक्की वाचा किडनी विकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका!
किडनी विकारांचे प्रकार-
१. जन्मापासून मूत्रविर्सजनाच्या मार्गात अडथळा असणे.
२. किडनी स्टोन
३. Glomerulonephritis ४. Nephrotic Syndrome
५. मूत्रमार्गातील इनफेक्शन
६. मूत्रपिंडाचे कार्य थांबणे
७. मूत्रपिंड दोषामुळे होणारे मूत्र विकार
किडनी विकारांचे निदान कसे करतात-
किडनी विकाराचे निदान करण्यासाठी काही तपासण्या केल्या जातात.
१. युरीन तपासणीमुळे युरीन मधील प्रोटीन्स,लाल रक्त पेशी(RBCs),पांढ-या रक्त पेशी(WBCs) व क्रिस्टल्सचे प्रमाण लक्षात येते.
२. मूत्रमार्गातील इनफेक्शन साठी युरीन कल्चर तपासण्यात येते.
३. मूत्रपिंडांच्या कार्यात बिघाड सुरु झाल्यास रक्तातील बन आणि क्रिएटीनाइन ची पातळी वाढण्यास सुरुवात होते.त्यामुळे त्याबाबत रक्त चाचणी करण्यात येते.त्याचप्रमाणे यासोबत इलेक्ट्रोलाइटस्,हिमोग्लोबीन व रक्तातील गॅसचे प्रमाण तपासणे देखील गरजेचे असते.
४. किडनी विकारामध्ये सोनोग्राफी टेस्ट करण्यात येते.त्यामुळे मूत्रपिंडाचा आकार, सिंगल किडनी व पोलिस्टीक किडनी या जन्मजात किडनी समस्या,किडनीला सूज येणे,मूत्रमार्गातील अडथळा,किडनी स्टोन,किडनीचा कॅन्सर याबाबत माहीती मिळू शकते.
५. आवश्यक्ता भासल्यास रीनल स्कॅन व किडनी बायोस्पी या चाचण्या देखील करण्यात येतात.
किडनी विकारांवर कोणते उपचार उपलब्ध आहेत-
किडनी विकारात प्रत्येक व्यक्तीनूसार निरनिराळे उपचार करण्यात येतात.मूत्रमार्गातील इनफेक्शन वर १० ते १४ दिवस एन्टीबायोटिक्स देण्यात येतात.प्रेडनीसोलोन(Prednisolon
मोठ्या माणसांमध्ये किडनी निकामी झाल्यास डायलिसीस व किडनी ट्रान्सप्लांटेशन करावे लागते.या समस्येवर लहान मुलांसाठी देखील हेच उपचार उपलब्ध आहेत.हे डायलिसीस हिमोडायलिसीस आणि पेरीटोनीएल डायलिसीस या दोन प्रकारे करण्यात येते.लहान मुलांसाठी यामधील पेरीटोनीएल डायलिसीस हा पर्याय निवडण्यात येतो.किडनीचे कार्य बंद पडल्याने शरीरात युरीया,क्रिएटीनाइन,पोटॅशियम व भरपूर प्रमाणात पाणी जमा होते.डासलिसीस करुन हे पदार्थांना बाहेर काढण्यात येतात.असे असले तरी डायलिसीस करुन किडनीचे विकार बरे करता येत नाहीत.
जाणून घ्या किडनीविकारांमध्ये डायलिसीसचा पर्याय कधी निवडला जातो ?
मूत्रपिंड विकाराच्या शेवटच्या स्टेजमध्ये किडनी ट्रान्सप्लांटेशन हा पर्याय असतो.भारतात देखील लहान मुलांच्या किडनी ट्रान्सप्लांटेशनचे उपचार उपलब्ध आहेत.सर्जरी करुन निरोगी व्यक्तीची किडनी या रुग्णांमध्ये बसवण्यात येते.ब्रेन डेड अथवा एखादी जीवंत व्यक्ती यासाठी किडनी दान करु शकते.मात्र यासाठी काही महत्वाच्या परवानग्या व कायदेशीर पद्धती करणे गरजेचे असते. नक्की वाचा डायलिसीस की किडनी ट्रान्सप्लान्ट – किडनीविकाराच्या रुग्णांनी नेमका कोणता पर्याय कधी निवडावा ?
प्रतिबंधनात्मक उपाय-
किडनी विकारातील उपाययोजना त्रासदायक व खर्चीक असतात.यासाठी आधीच योग्य ती काळजी व निगा राखल्यास हा विकार टाळता येतो.
किडनी विकारामध्ये कोणाचा सल्ला घ्यावा-
लहान मुलांच्या किडनी विकारांवर उपचार करणारे Paediatric Nephrologists तज्ञ असतात.मूत्रमार्ग व मूत्रपिंडाच्या विकारांवर देखील ते उपचार करतात.जर तुमच्या मुलांना तीन महीन्यांपेक्षा अधिक काळ मूत्रपिंडाबाबत कोणताही त्रास होत असेल,त्यांच्या रक्तातील क्रिएटाइन जास्त असेल व सोनोग्राफीमध्ये किडनीबाबत समस्या आढळल्या तर तुम्ही या तज्ञांचा सल्ला घेऊ शकता.त्याचप्रमाणे किडनी विकारांमध्ये सहकार्य करण्या-या अनेक संघटना आहेत. ‘किडनी फाउंडेशन फॉर चिल्ड्रन’ या संस्थेमुळे अनेक पिडीत मुलांना योग्य वेळी व योग्य पद्धतीने याबाबत मदत केली जाते. जाणून घ्या किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !
Read this in English Translated By – Trupti Paradkar छायाचित्र सौजन्य – Shutterstock