मराठी सिनेसृष्टीतील रोमान्स किंग आणि तरूणाईच्या गळ्यातील ताईत, अभिनेता स्वप्नील जोशी याने काल (१८ ऑक्टोबर) 38 वा वाढदिवस साजरा केला. स्वप्नील जोशीचा यंदाचा वाढदिवस अनेक कारणांमुळे खास होता. काही महिन्यांपूर्वीच स्वप्नील जोशीच्या घरी ‘मायरा जोशी‘ या चिमुकल्या परीचे आगमन झाले. त्यामुळे मुलीसोबतचा स्वप्नीलचा हा पहिला वाढदिवस होता. सोबतच ‘फुगे’ या आगामी चित्रपटाचा मोशन टिझरही प्रकाशित करण्यात आला. पण स्वप्नीलने यंदा वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोत्तर ‘अवयवदाना‘चा संकल्प केला आहे.
मुंबईत स्वप्नील जोशीने फुफ्फुस (lungs), किडनी (Kidney) आणि स्वादूपिंड (pancreas) यांचे मरणोत्तर दान करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी स्वप्नील सोबत त्याच्या अनेक चाहत्यांनीदेखील अवयवदानाचा संकल्प करत अवयवदानाचे फॉर्म भरके आहे. यावेळी ‘अवयवदान’चा संदेश असलेला खास केकही स्वप्नीलने मित्रमंडळींसोबत कापला.
चाहत्यांसोबत @swwapniljoshi ने सुद्धा केले #OrganDonation @TeamSwwapnil आणि @swwapnil_fc चा उपक्रम pic.twitter.com/KlmmNkQpLC
— Team Swwapnil (@TeamSwwapnil) October 19, 2016
अवयवदानाबाबत समाजात अनेक समज-गैरसमज असल्याने त्याबाबत अधिक जनजागृतीचे काम होणे गरजेचे आहे. केवळ रक्तदानापुरते सजग असलेला समाज मृत्यूनंतरही आपल्या अवयवादानाचे दान सुरक्षित पद्धतीने होऊ शकते या संकल्पनेकडे सजगतेने पाहणे गरजेचे आहे. म्हणूनच तुमच्या मनातूनही अवयवदानाबाबत काही चूकीचे समज असल्यास ते दूर सारून या दानासाठी एक पाऊल पुढे या. नक्की वाचा – वडीलांना यकृतदान करून , त्यांना जीवनदान देणार्या जुही पवारची प्रेरणादायी कहानी
Image Source – Twitter/ Team swwapnilJoshi