Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

या 7 कारणांमुळे वाढते Preterm Labour ची शक्यता

$
0
0

गर्भपात होण्यामागे अनेक कारणंं असू शकतात.जसे की गर्भधारणेसाठी मातेचे असलेले अयोग्य वय,गर्भारपणातील इनफेक्शन्स,आईच्या मानेच्या स्नायुंची अकार्यक्षमता.मात्र यापेक्षाही अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या नकळत केल्यास मिसकॅरेज होऊ शकते.

जाणून घेऊयात या काही महत्वाच्या गोष्टी-

१. स्मोकींग-

धूम्रपान करताना धुरासोबत तुम्ही ४००० केमिकल्स शरीरात सोडता.प्रत्येक पफ मागे तुमच्या शरीरात निकोटीन व कार्बन मोनोक्साईड शरीरात जाते जे अत्यंत हानिकारक असते.निकोटीन तुमच्या बाळाचे पोषण व त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणा-या नसांना संकुचित करते.तर कार्बन मोनोक्साईडचा तुमच्या बाळाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्या-या लाल रक्त पेशींवर विपरीत परिणाम होतो.ज्यामुळे पुढे गर्भपाताचा धोका वाढतो. हे नक्की वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

२. दोन पेक्षा अधिक कप कॉफी घेणे-

फक्त कॉफीच नाही तर चॉकलेट,कोक व काही हेल्थ ड्रिंकमधील कॅफेनचा गर्भावर वाईट परिणाम होतो.कॉफीचे अतिसेवन तुम्हाला उत्तेजित करते ज्यामुळे ह्रदयाचे ठोके वाढतात,छातीत जळजळ व एसिडीटी होते.प्रेगन्सीमध्ये कॅफेन घेतल्याने शारीरिक क्षमता कमी होते व रक्तदाब असतुंलित होतो. SportsNutritionistandDietician दीपशीखा अग्रवाल यांच्या मते,’गर्भवती महिलेने तिच्या प्रेगन्सीच्या पहील्या तिमाहीत जर कॅफेनचे अतिसेवन केले तर तिचा गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.’ जाणून घ्या हे ’5′ पदार्थ हेल्दी असले तरीही गरोदरपणात खाताना काळजी घ्या !

३. अतिवजन-

गरोदरपणात आपण आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींवर बंधन ठेवले पाहीजे.कारण अती खाण्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढते.यामुळे Pre-Eclampsia किंवा Gestational Diabetes होण्याचा धोका वाढतो.या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला मिसकॅरेजला सामोरे जावे लागू शकते. जाणून घ्या गरोदरपणाच्या काळात गर्भाचे योग्य वजन ठेवण्यासाठी ’5′ खास टीप्स !

४. प्रमाणापेक्षा अधिक व्यायाम करणे-

दररोज नियमित पुरेसा व्यायाम केल्यास प्रेगन्सीमधील इतर समस्या व गर्भपाताचा धोका टाळता येतो.मात्र अती प्रमाणात केलेला व्यायाम धोकादायक ठरु शकतो.एखादा कठीण व्यायाम प्रकार किंवा नेहमीपेक्षा अधिक चालणे व धावणे केल्यास ओटीपोटावर दाब येतो आणि गर्भपाताची शक्यता वाढते. जाणून घ्या गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

५. ताण-तणाव

फिजीओलॉजीच्या एका जर्नल मधील संशोधनानूसार ताणतणावाचा बाळाचे पोषण करणा-या नाळेवर चुकीचा परिणाम होतो.ज्यामुळे गर्भाचे योग्य पोषण होत नाही व गर्भपात होतो.

६. अल्कोहोल-

रोज किंवा अगदी कधीतरी केलेल्या मद्यपानाचा देखील बाळाच्या वाढीवर विपरित परिणाम होऊ शकतो.आईने खाल्लेल्या अन्नामुळे नाळेच्या माध्यमातून बाळाचे पोषण होत असते.पण जेव्हा आई मद्य घेते ते मद्य देखील नाळेतून बाळाला मिळते.त्यामुळे मिसकॅरेज होण्याची शक्यता असते.

७. तोंडातील अस्वच्छता-

मुंबईच्या Dentzz Dental Care मधील Aesthetic Dentist शंतनू जरादी यांच्या मते, ‘एका संशोधनात असे आढळून आले आहे की तोंडातील इनफेक्शमध्ये शरीरात प्रसुतीच्या वेळेस होणा-या हॉर्मोन्ससारखेच हॉर्मोन्स  निर्माण केले जातात.त्यामुळे दात किडणे,हिरड्यांमधून रक्त येणे किंवा सूज असल्यास,माऊथ अल्सर झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता वाढते.’यासाठी बाळाच्या आगमनाची तयारी करण्यापुर्वीच दातांची योग्य निगा राखा.

Read this in English

Translated By – Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>