अचानक डोळा लवणे किंवा फडफडणे हे तसं खूपच सामान्य लक्षण आहे.यामध्ये ब-याचदा फक्त डोळ्याच्या वरचीच पापणी फडफडते मात्र कधीकधी खालची पापणीही फडफडू शकते.अचानक जाणवणारा हा त्रास थोडया वेळात आपोआप कमी होतो.मात्र कधी कधी एक आठवडा किंवा एक महीनाही तुम्हाला डोळा फडफडण्याचा त्रास जाणवत राहतो.या आजाराला मायक्योमिया(myokymia)असे म्हणतात.डोळ्यांच्या पापण्यांमधील स्नायूंच्या आकुंचनामुळे हा त्रास जाणवतो.
मुंबईतील सायन येथील K.J.Somaiya Medical College and Research Centre च्या Department ofOphthalmology चे Associate Professor डॉ.ओंकार तेलंग याच्या मते डोळा लवण्याची नेमकी काय कारणे आहेत हे जाणून घेवूयात.
१. ताणतणाव-
डोणे लवण्याचे मुख्य कारण ताणतणाव हे असू शकते.तुमच्या जीवनातील ताणतणावाचा तुमच्या शरीरावर विपरित परिणाम होत असतो.ज्याचा परिणाम तुमच्या दृष्टीवर देखील होऊ शकतो. जाणून घ्या डोळ्यांवरील ताण हलका करणारे घरगुती उपाय
२. थकवा-
अपु-या झोपेमुळे शरीराला आवश्यक तो आराम मिळत नाही.त्यामुळे देखील कधीकधी डोळे फडफडू लागतात.यासाठी पुरेशी झोप घेणे नेहमीच फायद्याचे असते.
३. डोळ्यांवर ताण येणे-
तुम्ही तुमच्या चष्म्याचा नंबर अथवा चष्म्याच्या काचा नियमित बदलणे गरजेचे असते.मात्र असे न केल्यास डोळ्यांवर ताण येतो.त्याचप्रमाणे सतत डोळ्यांवर ताण येईल असे काम केल्याने देखील हा ताण जाणवतो.यासाठी नियमित डोळ्यांची तपासणी करा. हे नक्की वाचा डोळ्यांच्या आरोग्याविषयक ’5′ रंजकअन महत्त्व पूर्ण गोष्टी !
४. कॅफेन-
कॅफेनच्या अतीसेवनानेही डोळे लवण्याचा त्रास जाणवतो.यासाठी चहा,कॉफी,चॉकलेट व सॉफ्ट ड्रींक्सचा कमी वापर करा.
५. डोळे कोरडे होणे-
वयाच्या पन्नाशी नंतर डोळे कोरडे होण्याची शक्यता असते.तसेच जे लोक कामाच्या ठिकाणी सतत कंम्युटरचा वापर करतात त्यांनाही डोळे कोरडे होत असल्याचा अनुभव येतो.काही ठराविक औषधांचा नियमित वापर केल्याने किंवा नियमित कॉन्टॅंक्ट लेंन्सचा वापर केल्याने डोळे कोरडे होतात व ते फडफडण्याची समस्या निर्माण होते.याबाबतीत विशेष काळजी घेतल्यास डोळे फडफडण्याचा त्रास हळूहळू कमी होतो. जाणून घ्या कसे जपाल डोळ्यांचे आरोग्य ?
६. एलर्जी-
डोळ्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्यास डोळ्यांमध्ये खाज येते,डोळ्यांमध्ये सुज व पाणी येण्याची शक्यता असते.ज्यामुळे डोळा लवण्याचे प्रमाण वाढते.वेळीच डॉक्टरच्या सल्यानुसार औषधोपचार केल्यास हा त्रास बरा होऊ शकतो.
७. अल्कोहोल-
सतत मद्यपान केल्याने डोळ्यांची फडफड होण्याचे प्रमाण अधिक होते.यासाठी मद्यपान करणे टाळा.
८. असतुंलित आहार-
निरोगी आयुष्यासाठी योग्य पोषणमुल्ये घेणे आवश्यक्त असते.मात्र जर तुमचा आहार असतुंलित असेल तर शरीराला मॅग्नेशियमसारखी पोषण मुल्ये पुरेश्या प्रमाणात मिळत नाहीत व त्यामुळे देखील डोळे फडफडण्याच्या त्रास उद्धवतो. जाणून घ्या डोळ्यांचे आरोग्य वाढवणारी 6 सुपरफुड्स !
डोळे फडफडणे ही एक सामान्य समस्या असून याचा मज्जातंतूच्या गंभीर आजाराशी काहीही सबंध नाही. मात्र या त्रासात कधीकधी डोळे उघडणे कठीण होते या समस्येला blepharospasm किंवा hemi facial spasm असे म्हणतात.ही समस्या औषध उपचारांनी बरी करता येते.डॉ.तेलंग यांच्या सल्ल्यानूसार वारंवार होण्या-या डोळे लवण्याच्या समस्येवर बोटोक्स इंजेक्शन द्वारे उपचार केले जातात ज्यामुळे डोळ्यांच्या या स्नायूंच्या आकुंचनावर नियंत्रण येते.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock