Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

गरोदरपणात पोटदुखीच्या त्रासाची कधी घ्यावी गंभीर दखल

$
0
0

गरोदरपणात पोटात दुखणे ही काळजीची बाब आहे.अशा पोट दुखण्याचे  कारण साधं अपचन किंवा अर्जीण असू शकते किंवा ही पोटदुखी अगदी एक्टॉपिक प्रेगन्सीमुळे किंवा मिसकॅरेजमुळे देखील असू शकते.मात्र असले तरी पोटदुखी गरोदरपणातील एक सामान्य लक्षण असल्याने त्याबाबत विशेष काळजी करण्याचे काही कारण नाही. जाणुन घेऊयात Cloudnine Hospital, Mumbai च्या Consultant Gynaecologist and Obstetrician डॉ.मेघना सरवैया यांच्या मते प्रेगन्सीच्या पहिल्या, दुस-या आणि तिस-या तिमाहीत पोटात दुखण्याची काही महत्वाची कारणे. हे नक्की वाचा गरोदरपणात आढळणारीही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

पहिल्या तिमाहीतील पोटदुखी-

पहिल्या तिमाहीत पोटात दुखणे सामान्य आहे.याची कारणे गर्भाशयाची होणारी वाढ,बद्धकोष्ठता व पोटात गोळा येणे ही असु शकतात. Acidity किंवा GERD मुळे कधीकधी पोटाच्या वरच्या भागात दुखु शकते.जरी पहिल्या तिमाहीत गर्भाशयाची वाढ बाहेरुन दिसत नसली ते वाढताना होणारा ताण आपण अनुभवू शकतो.त्यामुळे ओटीपोटीत वेदना जाणवू शकतात.प्रेगन्सीच्या पुढील काळात चालताना व वळताना पोटीतील वेदना तीव्रपणे जाणवतात.या वेदना कंटाळवाण्या व त्रासदायक देखील असु शकतात. हे नक्की वाचा गर्भारपणाच्या पहिल्या तीन महिन्यात कोणती काळजी घ्याल ?

दुस-या किंवा तिस-या तिमाहीतील पोटदुखी-

प्रेगन्सीच्या या काळातील पोटदुखीमुळे अस्वस्थता जाणवल्यास गांभीरयाने घेणे गरजेचे आहे.Braxton HicksContraction किंवा False Contraction मुळे पोटदुखीचा त्रास जाणवतो. तिस-या तिमाहीत पोटातील खालचे स्नायु आकुंचन व प्रसरण पावल्याने अचानक वरचेवर पोटातुन कळा येतात. प्रेगन्सीच्या काळात ओटीपोटाच्या वरच्या भागात कळासोबत छातीत जळजळ व GERD चा त्रास हा असिडीटीमुळे होतो.अधिक प्रमाणातील असिडीटीचा त्रास हे हायपरटेंशन व Preeclampsia चे लक्षण असू शकते.असिडीटीमुळे पोटीतील वरच्या भागात दुखत असेल तर नियमित रक्तदाबाची तपासणी करा. जाणून घ्या गर्भवती स्त्रीच्या आहारात आवश्यक असलेली दहा सुपरफूड्स

पोटदुखी गंभीर केव्हा असु शकते-

पोटदुखीमध्ये जर मासिक पाळीप्रमाणे वेदना,स्पॉटींग किंवा ब्लीडिंग होत असेल तर हे मिसकॅरेजचे लक्षणे असू शकते.

  • हे UTI चे लक्षण असु शकते जर पोटदुखीसोबत तुम्हाला वारंवार लघवीला (युरिन) जळजळ व खाज येत असेल तर.
  • ३७ आठवड्याच्या आधीच ओटीपोट ताणले जाऊन पोट व पाठीतुन तीव्रकळा येत असतील हे मुदतपुर्व प्रसुती (प्रीटर्म लेबर)चे लक्षण असु शकते.
  • जर सतत पोट दुखतच असेल व पोटदुखीच्या तीव्र कळा न थांबता वाढतच असतील तर placental abruptionअसु शकते ज्या मध्ये नाळ गर्भाशया पासुन वेगळी होते.
  • जर प्रेगन्सीच्या सहा ते दहा आठवड्यातच ब्लिडींग व पोटदुखी जाणवत असेल तर ते एक्टॉपिक प्रेगन्सी किंवा ट्युबमध्ये गर्भधारणा झाल्याचे लक्षण आहे.
  • जर तुम्हाला प्रेगन्सीमध्ये पोटदुखीची ही लक्षणे जाणवत असतील तर त्वरीत तुमच्या डॉक्टरकडे जा व तपासणी करुन घ्या.

Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>