Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मुली पाहण्याचा कार्यक्रम करताना या ’4′गोष्टींकडे अवश्य लक्ष द्या

$
0
0

मुलं किंवा मुलींचे लग्नाचे वय झाले की त्यांच्या घरच्यांना कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाचे वेध लागतात.अरेंज मॅरेजमध्ये मग तरुणांसाठी एखाद्या मुलीच्या घरी तिला पहाण्यासाठी जाणे हा एक रोमांचक कार्यक्रम असू शकतो.तिच्या घरच्यांना इंप्रेस करताना कधी कधी काही गोष्टी जाणवत नाहीत.पण त्यांचा तुमच्या भविष्यावर परिणाम होत असतो.यासाठी या महत्वाच्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या.

तिच्या घरचे तुमच्याशी संवाद करताना कसे वागतात किंवा बोलतात यांचे नीट निरिक्षण करा कारण यावरुन ते भविष्यात तुमच्यासोबत कसे वागतील हे तुम्हाला समजू शकते.

याबाबत दिल्ली येथील Psychologist डॉ.अजय गुप्ता यांच्या कडून जाणून घेवूयात काही महत्वाच्या टिप्स-

१. सावध राहा जर तिचे कुटूंबीय एखादा मुद्दा जबरदस्ती पटवत असतील तर-

प्रत्येक व्यक्तीवर तिच्या घरातील संस्काराचा पगडा असतो.तिच्या किंवा त्याच्या वागण्या-बोलण्यातून घरातील संस्कार दिसत असतात.घरातील व्यक्तींच्या चांगल्या व वाईट सवयी देखील तुमच्यामध्ये नकळत उतरत असतात.जर तिच्या घरचे तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत जबरदस्ती करीत असतील तर या स्थळाबाबत पुढे जाण्याचा विचार थांबवा.किंवा जर तुम्ही त्यांना अजून एक संधी देण्याचा विचार करीत असाल तर त्या मुलीला याबाबत स्पष्टपणे तुमचे मत सांगा.  जाणून घ्या मुलींमधील हे ’8′ गुण मुलांना करतात अधिक इम्प्रेस !

२. जर ते त्यांच्या मर्यादा ओलांडीत असतील-

तुमच्या दोघांमधील कोणताही निर्णय घेताना ती सतत घरच्यांचे मत घेत असेल तर सावध रहा.कारण यामुळे पूढे तुम्हा दोघांनाही सतत तिच्या घरच्यांचे ऐकावे लागू शकते.यासाठी तुमच्या पुढील आयुष्यातील काही खास निर्णय तुम्ही दोघेच मिळून घेणार हे त्यांना आत्ताच स्पष्टपणे करा. जाणून घ्या विशीत लग्नाचा निर्णय टाळण्यासाठी मुली पालकांना देतात ही ’10′ कारणं!

३. जर तुम्हाला तिच्या घरच्यासोबत प्रचंंड अस्वस्थ वाटत असेल तर-

लग्नाचा निर्णय घेताना ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे.कारण अशी अस्वस्थता तुम्हाला पहील्या भेटीत जाणवणे सहाजिकच आहे.पण नंतरही जर तुम्हाला तीच्या घरच्यांसोबत आपलेपणा वाटत नसेल तर त्याचा त्रास तुम्हाला या नातेसंबधात पुढे होऊ शकतो.यासाठी त्यांसोबत मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा. हे नक्की वाचा सिंगल मुलींनो ! या ’6′ डेटिंग टीप्स टाळाच

४. तिच्या घरचे तुमची जरा जास्तच चेष्टामस्करी करीत असतील तर-

लग्नकार्यात थोडीफार चेष्टामस्करी करणे स्वाभाविक आहे.पण जर तिच्या घरचे तुमची सतत चेष्टा करीत असतील किंवा तिच्या घरची इतर मंडळी हसतखेळत तुमचा अपमान करीत असतील तर त्याबाबत तुम्ही तुमच्या भावी पत्नीसोबत बोला.तिचे याबाबत काय मत आहे यावरुन तुम्ही तुमच्या भविष्यातील पुढील निर्णय घ्या.

Read this in English

Translated By – Trupti Paradkar

छायाचित्र सौजन्य – Youtube/Eros Now


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles