गरोदरपणाच्या काळात दिवसेंदिवस जसा काळ पुढे सरकतो. तशी अधिक काळजी घेणे गरजेचे असते. गरोदरपणाच्या काळात शरीरातून पांढरे पाणी बाहेर टाकले जाते. शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. या काळात पेल्व्हिक भागाला होणारा रक्तपुरवठाही अधिक असतो. त्यामुळे पांढर्या रंगाचा गंध रहित स्त्राव वाहतो. मात्र हा स्राव करडा किंवा पिवळसर रंगाचाआढळल्यास ते इंफेक्शन असू शकते. त्यामुळे गरोदरपणाच्या काळात कोणत्याही प्रकारचे स्त्राव आढळल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असा सल्ला स्त्रीरोगतज्ञ डॉ. संगीता अग्रवाल देतात.
- पांढर्या रंगाचे गंध विरहीत स्त्राव -: गरोदरपणाच्या काळात शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने पांढर्या रंगाचा स्त्राव होतो. अशा स्वरूपाचा स्राव होणे सामान्य आहे. हा स्राव होणे म्हणजे योनीमार्गातील शुष्कता नसल्याचे संकेत देतात. यामुळे योनिमार्गाजवळ जळजळ,खाज येण्याचा त्रास होत नाही.
- करड्या रंगाचा स्राव - गरोदरपणाच्या काळात होणार्या हार्मोनल बदलांमुळे शरीरात बॅक्टेरिया साचून राहण्याचे प्रमाण वाढते. अति प्रमाणात बॅक्टेरिया साचल्यास चांगले आणि घातक बॅक्टेरिया या मधील संतुलन बिघडते. परिणामी यामधून काही इंफेक्शन निर्माण होते. या समस्येला bacterial vaginosis म्हणतात. अशाप्रकारचा स्त्राव आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- पांढरा- पिवळसर स्त्राव – योनिमार्गामध्ये यिस्ट इंफेक्शन असल्यास पांढरा- पिवळसर रंगाचा स्त्राव वाहतो. बॅक्टेरियाप्रमाणेच योनिमार्गामध्ये Candida नामक यीस्ट आढळतात. मात्र शरीरातील estrogen आणि progesterone या हार्मोन्सच्या निर्मितीचे प्रमाण वाढल्यास या यीस्टची देखील वाढ होते. परिणामी पिवळसर रंगाचा स्त्राव वाहतो. या स्त्रावासोबत जळजळ, खाज, वेदना वाढल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- रक्त पडणे - हा एक महत्त्वाचा संकेत आहे. तुम्ही गरोदर असल्यास स्पॉटिंगच्या 10-15 दिवसांनंतर implantation bleeding होते. त्यामुळे तुम्ही गरोदर असल्याची खात्री करून घ्या.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock