अनेकजण जेवणानंतर पचनासाठी किंवा मुखशुद्धीसाठी नागवेलीचं (खायचं) पान घेतात. पण त्याचे फायदे केवळ इथपर्यंत मर्यादीत नसून त्याचे सुपारीसोबत सेवन केल्यास ते कामवासना उत्तेजित करायला मदत करतात. अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणानंतर स्त्रिया आपल्या पतीला पान बनवून देतात ही प्रथाच आहे. पण यामुळे तुमचे सेक्सलाईफ सुधारते हे तुम्हांला ठाऊक आहे का?
कसे आहे फायदेशीर ?
पानामध्ये जेव्हा सुपारी, चुना, लवंग आणि गुलकंद यांचे मिश्रण भरून एकत्र पान बनवले जाते तेव्हा त्याचा स्वाद आणि मनाला आणि शरीरालाही फायदेशीर ठरतो. पानामुळे पचनशक्ती सुधारते. पण त्यासोबतच शरीराच्या पुनरोत्पादन क्षमतेला चालना मिळाल्याने तुमचे सेक्स लाईफ उंचावण्यास मदत होते. पानातील गुलकंद शरीराला उर्जा देते, त्यामुळे दिवसभराचा थकवा दूर होण्यास मदत होते. यासोबतच गुलकंदाचे अधिक फायदे जाणण्यासाठी येथे क्लिक करा.
कसे बनवालं पान ?
स्वच्छ पुसलेल्या पानाचा देठ कापा.
त्यावर थोडासा चूना पसरवा.
नंतर त्यावर अर्धा चमचा गुलकंद पसरवा.
सुपारी कातरून त्यावर अर्धी सुपारी आणि लवंग घाला.
या पानाची गुंडाळी करून हळूहळू चघळा.
रात्रीच्या जेवणानंतर तयार पान घेतल्यास तुम्हांला नक्कीच फायदा होईल. खायच्या पानामध्ये हे जादूई मिश्रण मिसळा आणि वजन घटवण्यासोबतच पचनाचे विकारही घटवा.
संबंधित दुवे -
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - Chew paan (betel leaf) for better sex
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.