स्त्रियांचे खरे सौंदर्य तिच्या केसांमध्ये असते. म्हणूनच त्या नितळ त्वचेसोबतच केसांचे आरोग्य सुधारण्याबाबत दक्ष असतात. रुक्ष आणि गुंतणार्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही केमिकल फ्री प्रसाधनांचा वापर करणं गरजेचे आहे. मग यासाठी विकतची प्रसाधनं घेण्याऐवजी हा घरगुती उपाय करून पहा.
घरगुती उपाय हे सुरक्षित असल्याने त्याचा वापर करणे सहज सोपा असतो. डरमॅटोलॉजिस्ट डॉ. शेफाली त्रासी यांच्या सल्ल्यानुसार केसांवर इसेंशियल तेलाचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. लव्हेंडर इसेंशिअल ऑईलचे काही थेंब साखरपाण्यात मिसळावेत. हे मिश्रण एका बाटलीत भरून तुम्ही गरजेला वापरूही शकता. यामुळे झटपट केसांच्या समस्या दूर होतात.
कृती -:
• अर्धा कप पाणी उकळा.
• उकळ आल्यानंतर त्यात 2 टीस्पून साखर, 2 टीस्पून रबिंग अल्कोहल व 1-2 थेंब आवडीचे इसेंशियल ऑईल पाण्यात मिसळा.
• हे मिश्रण नीट एकत्र करून स्वच्छ स्प्रे बॉटलमध्ये मिसळा. मात्र हे मिश्रण थंड केल्याशिवाय भरू नका.
• वापर करण्यापूर्वी हा स्प्रे नीट हलवून मगच आवश्यकतेनुसार केसांवर मारा.
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - Get super silky hair with this home-made hair spray
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.