आजकाल बाजारात ब्रोकोली बाजारात सहज उपलब्ध असतात. फ्लॉवरप्रमाणे दिसणारी ही हिरवी घेण्याचा मोह अनेकदा होतो . परंतू ब्रोकोली आपल्यासाठी ही भाजी नवीन असल्याने नेमका त्याचा वापर कसा करावा ? याबाबत अनेक प्रश्न मनात असतात.
ब्रोकोलीमधील पोषणद्रव्य – :
ब्रोकोलीमध्ये अॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच डायटरी फायबर्स, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C आणि व्हिटॅमिन K मुबलक प्रमाणात आढळतात. सोबतीला ब्रोकोलीमध्ये झिंक, फॉस्फर्स आणि आयर्न यासारखी मिनरल्स आढळतात. लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरते. ब्रोकोलीचा आहारात समावेश केल्याने मुलांची पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. म्हणूनच आबालवृद्धांसाठी ब्रोकोलीचा आहारात अधिक हेल्दी आणि टेस्टी स्वरूपात कशाप्रकारे समावेश करता येतो हे जाणून घेण्यासाठी या खास रेसिपी नक्की आजमावून पहा.
- ब्रोकोली सूप - लहानमुलांच्या आहारात भाज्यांचा, पालेभाज्यांचा समावेश करायचा असेल तर सूप हा पर्याय उत्तम आहे. मुलांच्या गळी भाज्या उतरवण्यासाठी सूप हा छुपा आणि मजेशीर पर्याय आहे. मुलांच्या आवडीच्या फिलिंगने त्याचा आहारात समावेश वाढवू शकता. नक्की वाचा : थंडीच्या दिवसांसाठी खास ’5′ हेल्दी टेस्टी सुप रेसिपीज !
- ब्रोकोली पिझ्झा - घरच्या घरी पिझ्झा बेस बनवून त्यावर आवडीनुसार सॉस लावून चिरलेली ब्रोकोली पसरवा. त्यावर खिसलेले मोझेला चीझ (mozarella cheeze) चा थर पसरवा. हा पिझ्झा थोडा बेक करून मुलांना खायला द्यावा. चीझ आणि ब्रोकोली एकत्र चविष्ट लागत असल्याने मुलांना फार आवडते.
- ब्रोकोली पास्ता - व्होलव्हीट पास्ता आणि व्हाईट सॉससोबत बनवताना त्यामध्ये चिरलेली ब्रोकोली मिसळा. ब्रोकोली प्रमाणेच पालकचा आहारात समावेश करण्यासाठी या खास रेसिपी मुलंही आवडीने खातील अशा पालकाच्या ’5′ रेसिपीज !
- ब्रोकोली सॅन्डव्हीच - गव्हाच्या पावावर पावणाकप चिरलेली ब्रोक्रोली आणि खिसलेला चीझ यांचे मिश्रण पातळ करून पसरवा. यामध्ये तुम्ही व्हाईट सॉसही मिसळू शकता.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock