छातीत दुखत असल्यास हा थेट हार्ट अटॅक असेल असा अनेकांचा समज होतो. आणि घाबरून जाऊन मनातल्या मनात या जीवघेण्या आजाराबाबतची भीती अधिक वाढते. मात्र छातीत दुखण्यामागे इतरही अनेक कारणं असू शकतात. फुफ्फुस, पाठीचा कणा, अन्ननलिकेचा त्रास किंवा हार्ट टिश्यूंना काही त्रास होत असल्यास यामुळेही छातीचे दुखणे वाढू शकते. याबाबतचा खास सल्ला Asian Heart Institute, Mumbai, चे Senior Interventional Cardiologist आणि Head Department of Cardiology, डॉ. तिलक सुवर्णा यांनी दिला आहे. मग नक्की जाणून घ्या हृद्यविकाराशिवाय छातीचे दुखणे कशामुळे जाणवते ? आणि या ’4′ लक्षणांनी ओळखा तुम्हांला हार्ट अटॅक आलाय
- हृदयामधील इंफेक्शन – हृद्याविकारामध्ये छातीत तीव्र वेदना जाणवणे, त्या छातीप्रमाणेच डाव्या हातातही पसरणे. हे हार्ट अटॅकच्या समस्येमध्ये आढळते. मात्र हार्टच्या इंफेक्शनमध्ये छातीत मध्यभागी वेदना जाणवतात. या वेदना कार्डीएक पेनप्रमाणेच असतात. मात्र निदान केल्यानंतर कोणतेही ब्लॉकेजही आढळत नाहीत.
- हृद्यामध्ये काही दोष निर्माण होणं – स्ट्रक्चरल अॅबनॉरमिटीमुळे अनेकदा छातीमध्ये वेदना अधिक जाणवतात. तुम्हांला छातीत दुखण्यासोबतच श्वास घेताना त्रास होत असल्यास हे hypertrophic cardiomyopathy चे लक्षण आहे. हा एक जेनिटिक आजार आहे. यामध्ये हृद्याचे स्नायू अधिक जाडसर होतात. या समस्येला mitral valve prolapse म्हणतात. यामध्ये छातीत दुखण्याचा त्रास जाणवतो.
- फुफ्फुसांकहे आजार – फुफ्फुसावरील आवरणामध्ये दाह जाणवत असल्यास यामुळेही छातीचे दुखणे वाढते. यामुळे श्वास घेताना, खोकताना, शिंका आल्यास छातीत दुखते. न्युमोनियाच्या आजारामध्येही फुफ्फुसावरील आवरणामध्ये दाह जाणवतो. तर अस्थमाच्या त्रासामध्ये श्वसननलिकेत त्रास जाणवत असल्यास छातीचे दुखणेही वाढते. pulmonary embolism सारख्या समस्येमध्येही छातीत दुखते.
- नर्व्ह /हाडांचा त्रास – काही वेळेस छातीजवळ भागाला एखाद्या अपघातामुळे मार बसणे, नसा दुखवणे, बरगड्यांना मार बसणे किंवा फ्रॅक्चर होणे हा त्रास झाला असल्यास छातीत दुखते. बरगड्यांमधील दुखण्याला osteochondritis म्हणतात. या त्रासामध्ये छातीत तीव्र वेदना जाणवतात. पाठीच्या कण्यामधील दुखणे किंवा अपघातामुळेही छातीत दुखते. अनेकदा हा त्रास कार्डीएक पेन म्हणून समाजला जातो. नागीणचा त्रास असल्यास ती त्वचेवर उमटण्याआधी नर्व्हमध्ये दाह निर्माण करत असल्याने छातीचे दुखणे वाढवते.
- गॅस्ट्रोइंटेन्शिअल प्रॉब्लेम – अनेकांचा अॅसिडीटी आणि हार्ट अटॅकमुळे छातीत होणारा त्रास यात गल्लत होते. अन्ननलिकेला अल्सर वाढत असल्यास यामध्ये छातीत दुखण्याचे प्रमाणही वाढते. Heart attack आणि Cardiac arrest यामध्ये नेमका फरक काय असतो ? हे देखील जाणून घ्या.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock