सणसमारंभ असो किंवा एखादे लग्न भारतीय पारंपारिक जेवणाच्या पंगतीत नेहमी वरण-भात,भाजी-पोळी,लोणचे,कोशिं
भारतीय खाद्यपरंपरेत आपल्या पूर्वजांनी अशी पद्धत सुरु केली असेल तर त्यामागे काहीतरी वैदकीय कारण नक्कीच आहे. आम्ही आयुर्वेद तज्ञ रमण मिश्रा यांच्याशी याबाबत संवाद साधला तेव्हा त्यांनी आम्हाला या रहस्यमय प्रश्नाचे उत्तर दिले.
तुम्हाला माहीत आहे का जेव्हा आपण जेवताना मसालेदार पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीरात पाचक प्रक्रिया वाढवणारे रस आणि आम्ल तयार होतात.या चमचमीत पदार्थांमुळे आपल्या शरीरात पचन प्रक्रिया सक्रीय होते.याउलट गोड पदार्थांमध्ये अधिक प्रमाणात कर्बोदके असल्याने पचन प्रक्रिया मंदावते.गोड पदार्थांतील साखरेचे प्रमाण शरिरातील अत्यावश्यक ट्रिप्टोफॅन अमीनो आम्ल शोषून घेते. ट्रिप्टोफॅन शरिरातील सेरोटोनिन व न्युरोट्रान्समिटरची पातळी वाढवते ज्यामुळे मनाला समाधान झाल्याची भावना निर्माण होते.ही एक अशी भावना आहे जी जेवणांनंतर निर्माण व्हायला हवी.याला आपण पोट तृप्त झाल्याची भावना देखील म्हणू शकतो. जाणून घ्या भारतीय खाद्यसंस्कृतीतील या ’5′ सवयी वाढवतात हृद्यविकाराचा धोका !
आपल्या भारतीय संस्कृतीत जेवणाची सुरुवात तिखट,मसालेदार पदार्थाने केली जाते तर शेवट गोडाने केला जातो तो याच कारणासाठी.जेवणानंतर गोड खाल्याने मन तृप्त होते.मात्र असे जरी असले तरी साखरेपासुन तयार केलेले गोड पदार्थ आरोग्यसाठी अहितकारकच आहेत.साखरयुक्त गोड पदार्थ खाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण तर वाढतेच त्यासोबत तुम्हाला लठ्ठपणा व इतर आजारही होण्याचा धोका निर्माण होतो.हा धोका टाळायचा असेल तर गोड पदार्थ तयार करताना साखरे ऐवजी गुळ अथवा ब्राऊऩ शुगरचा(चॉकलेटी साखर) वापर करा.सेंद्रीय गुळ यावर चांगला पर्याय ठरु शकतो. हे नक्की वाचा जेवणानंतर गोड खाणे ही आरोग्यदायी सवय आहे का ?
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock