आहारात पालेभाजी म्हटली म्हणजे अनेकजण नाकं मुरडतात. आणि त्यात ‘शेपू’ची भाजी म्हटली की त्याच्या एका विशिष्ट वासामुळे अनेकजण ती टाळतात. मात्र शेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि आयर्नचा मुबलक साठा असतो. शेपू आहारात घेण्यासाठी त्याचा वापर सूप्स, सलाड आणि विविध भाज्यांमध्ये मिसळूनदेखील केला जातो. शेपूमध्ये अधिक प्रमाणात कॅलरिज नसल्या तरीही पोषणद्रव्य अधिक प्रमाणात अढळतात. म्हणूनच तुमच्या घरात वर्षानुवर्ष आहारात शेपूच्या भाजीचा समावेश असतो. मग आता तुमच्याही आहारात शेपूच्या भाजीचा समावेश करण्याची ही 7 कारणं जरूर जाणून घ्या.
- संसर्गापासून दूर ठेवतो
शेपूच्या भाजीमधील Polyacetylenes घटक हे अॅन्टीबॅक्टेरियल आणि दाहशामक असतात. पूर्वीच्या काळी संसर्गापासून बचाव करण्यासाठी जखमेवर शेपूच्या बीया लावल्या जात असे. तसेच शेपूमुळे मायक्रोबायलची वाढ रोखण्यास मदत होते तसेच शरीरातील फ्री- रॅडीकल्सची निर्मिती व प्रभाव कमी करण्यास मदत होते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो.
- पचनाचे विकार दूर होतात
शेपूची भाजी रेचक,पचायला हलकी असल्याने त्यामुळे पचनक्रियेचा मार्गदेखील मोकळा व स्वच्छ राहण्यास मदत होते. शेपूच्या बिया पचनमार्गातील बाहेरील स्तर स्वच्छ व सुरक्षित राहण्यास मदत होते असे काही संशोधनातून समोर आले आहे. अपचनामुळे छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी शेपू अतिशय फायदेशीर आहे.
- रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते
शेपूच्या बियांमध्ये आढळणारे तेल अनेक आजारांवर फायदेशीर आहे. मधूमेहींसाठी ‘शेपू’ फारच उपयुक्त आहे. रक्तातील साखरेचे सतत वर-खाली होणारे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. तसेच यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीचे कार्यदेखील सुधारते. शेपूप्रमाणेच मधुमेह नियंत्रित करणारे ’10′ रामबाण उपाय तुम्हांला ठाऊक आहेत का?
- झोप येण्यास मदत होते
शेपूच्या भाजीत असलेले फ्लेवोनॉईड्स आणि बी- कॉम्पलेक्स घटक हे निद्रानाशाची समस्या कमी करण्यास मदत करतात. शेपूच्या भाजीमुळे मेंदू व शरीर शांत राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हांला नैसर्गिकरित्या शांत झोप येण्यास मदत होते. तुम्हांला अजून किती तास झोप आवश्यक आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
- हार्मोन्सचे संतुलन राहते
असंतुलित हार्मोन्समुळे अनेक स्त्रियांमध्ये अनियमित मासिकपाळीची समस्या असते. मात्र शेपूतील पोषक घटक हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करतात. तसेच स्त्रीची पुनरुत्पादन क्षमता सुधारण्यास मदत करतात. (वेळेच्या आधी मासिकपाळी येण्याकरिता ’8′ घरगुती उपाय)
- हृद्याचे कार्य सुधारते
शेपूच्या भाजीतील पोषक घटकांमुळे ब्लड शुगर सोबतच कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात राहण्यासही मदत होते. परिणामी हृदयाचे कार्य सुधारते. त्यामुळे नैसर्गिकरित्या घातक कोलेस्टेरॉईलचे प्रमाण कमी करून चांगल्या कोलेस्टेरॉईलचे प्रमाण वाढवतात. कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
Translated By - Dipali Nevarekar
Sourece - Top 7 health benefits of dill leaves or suva bhaji
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.