Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

आयुर्वेदानुसार प्री- डायबेटीक्सचा आहार कसा असावा ?

$
0
0

रक्तातील साखरेची पातळी 100 mg/dl असेल तर ती सामान्य पातळी समजली जाते. मात्र रक्तातील साखरेचे प्रमाण 100 -140 mg/dl दरम्यान असल्यास तुम्ही मधूमेहाच्या धोक्याच्या पातळीवर आहात असे समजा. अशावेळी मधूमेहाचा त्रास होऊ नये म्हणून आहारात, व्यायामात काही बदल करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाने यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. म्हणूनच Sri Sri Ayurveda, Art of Living चे Founder-Director निशा मनिकांतन यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

मधूमेहींना त्यांचे पथ्यपाणी सांभाळणे गरजेचे आहे. त्यानुसार केव्हा आणि काय खावे याबाबत भान राखणे आवश्यक आहे. आजकाल सारेच घाईत असल्याने खाण्याच्या वेळा सांभाळणे हे प्रत्येकासाठी आव्हानच आहे. परंतू तुमचे स्वास्थ्य राहण्यासाठी किमान खाण्याच्या,झोपण्याच्या वेळा सांभाळणे गरजेचे आहे. आयुर्वेदाच्या सल्ल्यानुसार, प्री डायबिटिक्स लोकांनी वेळी अवेळी खाण्याच्या सवयीमुळे शरीरात अधिक प्रमाणात इन्सुलिन शोषले जाते. परिणामी मधूमेहाचा त्रास वाढतो.

या डाएट टीप्समुळे प्री डायबेटीक्समधील मधूमेह जडण्याचा धोका कमी होण्यास मदत होते

  • दिवसभरात जास्तीत जास्त 3 जेवणांचा समावेश करा. सोबत 1-2 नाश्ता घेऊ शकता. मात्र खाण्याच्या वेळांमध्ये पुरेसे आणि आवश्यक अंतर असणे गरजेचे आहे. दोन जेवणांदरम्यान भूक लागल्यास ताक किंवा शहाळ्याचे पाणी प्यावे.
  • नेहमी जेवणाच्या आणि नाश्त्याच्या वेळा या ठरलेल्या असाव्यात. यामुळे तुमचे जेवणाचे वेळापत्रक नियमित राहण्यास मदत होते.
  • जेवण टाळू नका. यामुळे अचानक रक्तातील साखरेचे प्रमाण झटकन उंचावण्याची शक्यता असते. तुमच्या आहारात कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि हिरव्या पालेभाज्यांचा मुबलक समावेश करावा.
  • आहारात नियमित कार्बोहायड्रेट्स त्याच प्रमाणात मिळतील याची काळजी घ्या. तुम्ही आहारात घेत असलेल्या पदार्थांमधून मिळणार्‍या कॅलरीजचे प्रमाण नियंत्रणात आणि आवश्यक तेवढेच असणे गरजेचे आहे. उदा. तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये चपातींचा समावेश करत असल्यास तुमचा नाश्ता आणि रात्रीच्या जेवणातही कोणत्यातरी स्वरूपात कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा. तुम्हाला ठाऊक आहे, एका चपातीत किंवा भाकरीत किती कॅलेरिज असतात ?

नक्की वाचा : मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज ! आणि तुम्ही मधुमेहाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करताय का ? हे देखील तपसून पहा. म्हणजे तुम्हांला मधूमेहाचा धोका वेळीच ओळखणे शक्य होईल.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>