Quantcast
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मधूमेहींसाठी खास झटपट रेसिपी –भरली भेंडी

मधूमेहाचा त्रास असणार्‍या व्यक्तीला हृद्यविकाराचा किंवा स्ट्रोकचा झटका  येण्याची शक्यता इतरांपेक्षा दुप्पट असतो. त्यामुळे मधूमेहावर आणि पर्यायाने रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी आहाराचे पथ्यपाणी सांभाळणे गराजेचे असते. मधूमेहींचा आहार व्हिटॅमिन्स, मिनरल्स, डाएटरी फायबर यांनी परिपूर्ण तर सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट्स यांचे प्रमाण कमी असावे. मधूमेहाचा त्रास कमी करण्यासाठी आयुर्वेदीक डाएटच्या मदतीने नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

भेंंडीच्या भाजीचा बुळबुळीतपणा अनेकांना आवडत नाही. पण Sri Sri Ayurveda च्या Founder-Director डॉ.निशा मनिकांतन यांच्या सल्ल्यानुसार, मधूमेहींच्या आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश करणे फायदेशीर ठरते. (नक्की वाचा :भेंडी खा आणि निरोगी रहा !!!) भेंडीची भाजी चिकाचिकीत असली तरीही त्यांला थोडा हेल्दी आणि टेस्टी ट्विस्ट देता येऊ शकतो. भेंडीसोबतच डाळींबाचे दाणे आणि खोबर्‍याचा समावेश केल्यास ती अनेक पोषणद्रव्यांनी परिपूर्ण होते. डाळिंब्याच्या दाण्यामुळे मधूमेहींना फायदा होतो. हृद्याचे कार्य सुधारण्यास मदत होते. गरमागरम चपाती किंवा फुलक्यांसोबत या भेडींच्या भाजीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. नक्की वाचा : मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !

कशी बनवाल भरली भेंडीची भाजी ?

साहित्य -:

  • चिरलेली भेंडी  – 250 gm
  • खिसलेलं ओल खोबरं – 1 and 1/2 tbsp
  • भोपळा – 2 tbsp
  • ताजी चिरलेली कोथिंबीर  – 1 tbsp
  • धन्याची पूड  – 1/2 tsp
  • काळामिरी पूड  – 1/4tsp
  • हळद – 1/2 tsp
  • डाळिंबाचे सुकलेले दाणे किंवा चिरलेला /सुकवलेला आवळा  – 1/2 tsp
  • गरम मसाला – 1/4 tsp
  • चवीनुसार सैंधव मीठ

भरली भेंडीसाठी लागणारा वेळ – सुमारे 10-15 मिनिटं

कृती -:

  • भरली भेंडी बनवण्यासाठी ती स्वच्छ धुवून वरचा भाग कापा.
  • भेंडी उभी चिरा मात्र दोन तुकडे होणार नाही याची काळजी करा.
  • भोपळा, डाळीब्याचे दाणे, / आवाळा, खोबरं, यामध्ये सारे मसाले आणि मीठ मिसळून एकत्र मिश्रण बनवा.
  • भेंडीमध्ये तयार मिश्रण नीट भरा.
  • तव्यावर चमच्याभर तेलामध्ये भरलेली भेंडी ठेवा.
  • 7-8 मिनिटे झाल्यानंतर भेंडी परता.
  • भेंडी खुरपूस भाजल्यानंतर बाहेर काढा.

गरम भरली भेंडी चपातीसोबत किंवा फुलक्यासोबत अधिक चविष्ट लागतात. तुम्हाला ठाऊक आहे, एका चपातीत किंवा भाकरीत किती कॅलेरिज असतात ?

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>