आरोग्याबाबत तसेच सौंदर्याबाबत काळजी घेणे हे केवळ स्त्रियांसाठी आवश्यक आहे. असा तुम्ही विचार करत असाल तर हा तुमचा गैरसमज आहे. स्त्रियांप्रमाणेच पुरूषांनीही स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. करियर, घर, संस्कार, पैशांच्या घाईगडबडीत अनेकदा पुरूष त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी वाढत्या वयानुसार अनेक दुर्लक्षित केलेले लहान लहान आजार जीवघेणे ठरतात. म्हणूनच वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पुरूषांनी खालील 5 गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- भावना व्यक्त करायला शिका -
स्त्रियांच्या तुलनेत पुरूष मोकळेपणाने भावना व्यक्त करत नाहीत. कामाचा ताण असो किंवा आयुष्यात त्रासदायक ठरणार्या लहान लहान समस्या असो, पुरूषांनी घरातील सदस्यांशी, मित्रांशी बोलून मन मोकळे करायला हवे. यामुळे डीप्रेशनचा वाढता विळखा कमी होण्यास मदत होईल. तसेच ताण कमी झाल्याने हृद्यविकार , रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. (नक्की वाचा :हृद्याचं आरोग्य सुधारणारी ’11′ हेल्दी ड्रिंक्स !)
- घातक व्यसनं सोडा –
कामाचा ताण किंवा तुमच्यासोबत होणार्या लहान सहान त्रासदायक घटनांपासून सुटका मिळवण्याचा उपाय म्हणजे ‘व्यसनं’ नव्हे ! व्यसनांनी कोणतीच समस्या संपुष्टात येऊ शकत नाही. उलट त्याचा शरीरावरच अधिक घातक परिणाम होते. मद्यपान किंवा धुम्रपानामुळे सेक्सलाईफ धोक्यात येते. तसेच हृद्यविकार, श्वसनाचे विकारादेखील बळावण्याची शक्यता अधिक वाढते. आरोग्यासोबतच तुमच्या वैयक्तिक / कौटुंबिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. नक्की वाचा : धुम्रपानामुळे होतात सेक्सलाईफवर गंभीर परिणाम !
- आहार आणि व्यायामाचे पथ्य पाळा -
फीट राहण्यासाठी संतुलित आहार, योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. रात्रीचे जागरण टाळून पुरेशी 8 तास झोप घेणे प्रत्येकासाठी आवश्यक तसेच दिवसाची सुरवात भरपेट आणि पौष्टिक नाश्त्याने करा. तसेच संतुलित आणि वेळेवर जेवण्याची सवय स्वतःला लावा. आहाराप्रमाणेच प्रत्येकाने व्यायाम करणेदेखील गरजेचे आहे. जिम, योगा किंवा आवडीनुसार एखाद्या शारिरीक अॅक्टिव्हिटीमध्ये स्वतः ला गुंतवा. व्यायाम ‘सिक्स पॅक अॅब ‘साठी नाही तर निरोगी स्वास्थ्यासाठी करा: अभिनेता भूषण प्रधानचा फीटनेस फंडा
- नियमित चेकअप करा -
स्त्री जीवनात वेगवेगळे टप्पे येतात. त्यामुळे एखाद्या टप्प्यांवर स्त्रियांना डॉक्टरांकडे जाऊन स्वतःची चाचणी करण्याची वेळ अनेकदा येते. मात्र पुरूषांच्या आयुष्यात असे ठराविक टप्पे नसल्याने त्यांना स्वतःहून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच नियमित मेडीकल चाचणी करून घेणे आवश्यक आहे.
- योग्य वेळी ब्रेक घ्या -
नवं घर, नवी गाडी, नवी नोकरी… सतत या विश्वात रममाण राहू नका. या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हांला स्वतःकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर सलामत तो पगडी पचास ! त्यामुळे कामातून योग्य वेळी ब्रेक घेऊन स्वतःकडेदेखील लक्ष द्या. यामुळे ताण कमी होण्यास आणि शांत व विचारपूर्वक निर्णय घ्यायला मदत होईल.
संबंधित दुवे -
पुरुषांनो ! सेक्स करण्यापुर्वी या ’5′ गोष्टी अवश्य जाणून घ्या
छायाचित्र सौजन्य – Shutterstock