किडनी कार्यामध्ये दोष निर्माण झाल्यानंतर किंवा किडनीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यास डायलिसीस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची मदत घेतली जाते. परंतू अनेकदा किडनी ट्रान्सप्लान्टमध्ये अनेक अडथळे येतात. मॅच होणारा योग्य दाता, आरोग्याबाबतच्या समस्या यांचादेखील विचार करणे गरजेचे असते. किडनीविकारामध्ये, रिपोर्टनुसार creatinine ची पातळी अधिक असल्यास किडनी ट्रान्सप्लान्ट करणे शक्य नसते. अशावेळी डायलिसीसचा पर्याय निवडला जातो. (नक्की वाचा : किडनी विकाराच्या या ’12′ लक्षणांना दुर्लक्षित करू नका !)
किडनीची कार्य करण्याची क्षमता झपाट्याने खालावल्यास, रक्तातील creatinine ची पातळी वाढते. असे होणे जीवावर बेतू शकते. परिणामी हृद्याचे कार्यही थांबण्याचा धोका असतो. म्हणूनच असावेळी शरीरातील रक्त बदलले जाते. या प्रक्रियेला डायलिसिस म्हणतात. वैद्यकिय मशिनचा वापर करून शरीरातील रक्त शुद्ध केले जाते. यामुळे काही आवश्यक पोषणद्रव्यांचाही नाश होतो. त्यामुळे डायलिसीसचे रुग्णांचे जीवनमान कमी होते असा सल्ला Lilavati, Breach Candy, Saifee Hospital चे Uro-Oncological & Robotic Surgeon डॉ. अनुप रूमाणी देतात.
किडनीविकारांवर उपचार करताना म्हणूनच डॉक्टर तात्पुरत्या काळासाठी डायलिसीसची मदत घेतात. रुग्णाला घरातील एखाद्या व्यक्तीची, मित्रपरिवारातील एखाद्या व्यक्तीची किंवा इच्छुक दात्याची किडनी मिळाल्यास रुग्णाचे जीवनमान सुधारण्याच्या अनेक आशा वाढतात. त्याचे जीवनमानही वाढण्यास मदत होते. नक्की वाचा : दूर करा ‘अवयव दाना ‘संबंधीचे हे ५ गैरसमज
- किडनी ट्रान्सप्लान्टच्या कार्यात कोणते आजार अडथळा आणू शकतात ?
किडनी ट्रान्सप्लान्टनंतर रुग्णाचे जीवन अधिक सुसह्य होत असले तरीही काही शारिरीक व्याधी, समस्या किंवा आजार या कार्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतात. उच्च रक्तदाब, मधूमेह अशा आजारांमध्ये रुग्णाला अधिक धोका असतो. औषधोपचारांनी किडनी ट्रान्सप्लान्टच्या शस्त्रक्रियेपूर्वी मधूमेह, रक्तदाब नियंत्रणात आणला जातो.
यासोबतच कॅन्सर, डिमेन्शिया, लठ्ठपणा (40 पेक्षा अधिक बीएमआय ) अशा समस्यांमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि पुरेसा विचार करूनच किडनी ट्रान्सप्लान्टचा निर्णय घ्यावा. किंवा त्याऐवजी कोणते पर्यायी उपचार घेता येतील.
तुम्हांला इतर कोणते आजार नसल्यास किंवा किडनीचे कार्य कमजोर करणार्या इतर व्याधींचा त्रास नसल्यास डायलिसीसऐवजी किडनी ट्रान्सप्लान्टचा निर्णय अवश्य घ्यावा.राज्य सरकारच्या ,अवयव दान मोहीमेची ब्रॅन्ड अॅम्बेसेडर- जुही पवारचा Exclusive Interview !!
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock