चेहर्यावरील काळे डाळ कमी करण्यासाठी, चेहरा उजळावा याकरिता केमिकल पिल्स फायदेशीर ठरतात.केमिकल पिल्समुळे त्वचेवरील निस्तेज आणि मृत स्तर काढायला मदत होते. त्यामुळे त्वचा अधिक तजेलदार होते. चेहर्यावर लावले जाणारे केमिकल त्वचेतील टीश्यूंचे नुकसान टाळण्यास मदत करतात. केमिकल पिलमध्ये अॅसिड, फळांचा, बोटॅनिकल एक्सट्रॅक्ट किंवा दूधाचा समावेश असतो. त्वचेच्या पोतानुसार आणि समस्येनुसार कोणते पिल वापरावे याचा निर्णय डॉक्टर घेतात.
केवळ केमिकल पिल लावून तुम्हांला अपेक्षित निकाल मिळत नाहीत तर त्यानंतरही त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी प्रसिद्ध सेलिब्रिटी डरमॅटोलॉजिस्ट डॉ. जयश्री शरद यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
- पिल लावल्यानंतर लगेजच आईस कॉम्प्रेसेस चेहर्यावर फिरवावे. किमान 10-15 मिनिटे आईस कॉम्प्रेस चेहर्यावर ठेवा.
- केमिकल पिलनंतर किमान 10 दिवस चेहर्याला स्क्रब किंवा गरम पाणी लागणार नाही याची काळजी घ्या. या दिवसात चेहर्याला स्क्रब आणि गरम पाणी वापरू नका.
- सौम्य, न्युट्रल pH फेशिअल क्लिंजरचा वापर करा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी sebamed olive wash किंवा Cetaphil cleansing lotion चा वापर करावा.
- केमिकल पिल ट्रीटमेंट केल्यानंतर लगेजच तसेच सनस्क्रीन न लावता बाहेर पडू नका. उन्हात फिरत असल्यास किमान दोन – दोन तासांनी सतत सनस्क्रीन लावा.
- केमिकल पिल ट्रीटमेंटनंतर दोन दिवसांनी चेहर्यावर मॉईश्चरायझर लावायला सुरवात करा.
- केमिकल पिलनंतर काही तासातच त्वचेवरून एक पातळ स्तर निघायला सुरवात होते. तो स्तर काढण्यासाठी सतत चेहर्याला हात लावू नका. किंवा त्वचा खेचू नका.
- पिलिंग होताना अॅन्टी अॅक्ने क्रीमचा वापर करू नका. तसेच स्क्रीन लाईटींग क्रीम वापरणे टाळा.
- स्किन पिलिंग होताना ब्लिचिंग किंवा केस काढण्यासाठी थ्रेडींग, वॅक्सिंग करणे टाळा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock