भारतीय परंपरेत विवाह सोहळ्यात नववधुला मेहंदी काढण्याची पद्धत आहे.सिनेमातील मेहंदीवर रचलेली गाणी व नृत्य अशा मनोरंजक कार्यक्रमांंची धमाल असल्याशिवाय हा लग्नविधी पुर्ण होत नाही.प्रत्येक नववधू या मेहंदीच्या विधीची अगदी आतुरतेने वाट बघते.अशात तिच्या हातावर रंगलेली मनमोहक मेहंदीची डिझाईन तिच्या या आनंदात अधिक भर घालते.
असे मानले जाते की, हातावरील मेहंदीचा रंग जितका गढद चढतो तितके नववधु व तिच्या जोडीदारातील प्रेम अधिक दृढ होते.त्याचप्रमाणे अजून एक असा समज आहे की, जितके जास्त दिवस तिच्या हातावर मेहंदी टिकते तितके जास्त त्या नववधुला तिच्या सासरी प्रेम मिळते.मेहंदीच्या निरनिराळ्या डिझाईन्स मध्ये देखील जीवनातल्या अनेक गोष्टीचे संकेत लपलेले असतात.फुले,पक्षी,वधू आणि वरांची चित्रे अशा अनेक डिझाइन्स ब्राईडल मेहंदीत असतात.असं म्हणतात की, तळहाताच्या मागे काढलेली मेहंदी तिचे व तिच्या पतीचे संकटापासून सरंक्षण करते तर तळहातावरील फुलांच्या नक्षी तिच्या या नव्या आयुष्याच्या सुख-समृद्धीची प्रतिके असतात. हे नक्की वाचा हातावर मेंदी लावत असाल तर सावधान !
असे जरी असले तरी हातांना रंगवण्यासोबत मेहंदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.मेहंदी काढल्यामुळे लग्नसोहळ्यातील ताण-तणाव दूर होतो.नववधू व नववराच्या मनात लग्नापुर्वी एक भीती व आनंद अशी संमिश्र भावना असते.मेहंदीमध्ये शरीराला थंडावा देण्याची क्षमता आहे ज्यामुळे हा ताण-तणाव आपोआप दूर होतो.यासाठीच नववधुच्या हात व पायांवर मेंहदी काढण्यात येते.तसेच मेंहदीला येणारा उग्र सुवास लग्नानंतरच्या रोमॅन्टिक वातावरणाला प्रोत्साहन देण्यास मदत करतो. जाणून घ्या लग्नानंतर नववधूंचे वजन वाढण्याची ’5′ कारणं
लग्नामध्ये काढण्यात येण्या-या मेहंदीच्या पेस्टमध्ये लवंग तेल,लिंबूचा रस व निलगिरीच्या तेलाचा वापर करण्यात येतो.ज्यामुळे मेहंदी अधिक सुवासिक होते व तिच्या पासून मिळणारे औषधी फायदे अधिक जलद मिळतात.
References: [1] Abulyazida, Elsayed M.E. Mahdyb, Ragaa M. Ahmedb,Biochemical study for the effect of henna (Lawsonia inermis) on Escherichia coli, Arabian Journal of Chemistry, Volume 6, Issue 3, July 2013, Pages 265–273 [2] By Marie Anakee Miczak, Henna’s Secret History: The History, Mystery & Folklore of Henna, 2009, 160-Page Read this in English Translated By – Trupti Paradkar छायाचित्र सौजन्य – Shutterstock