Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

साप्ताहिक भविष्य आरोग्याचे ! (24 – 30 ऑगस्ट )

$
0
0

मेष

पचनाच्या विकारांकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच उपाय करा.अन्यथा त्याची गंभीरता वाढू शकते. त्यावर काही कायमस्वरुपी उपाय करून समस्येवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच बाहेरचे खाणे, जंकफूड खाणे  टाळा.

वृषभ

या आठवड्यात पचनाचे विकार  तुम्हांला अधिकच त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते अधिक वाढण्याआधीच त्यावर योग्य उपचार घ्या. ह्र्द्यविकार आणि रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्या.  तसेच उपचारांनी त्यांना नियंत्रणात ठेवा.

मिथून

मध्यमवयीन व त्याहून वयस्कर लोकांमध्ये सांधेदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. तसेच त्यावर दीर्घकालीन उपाय करण्याचा प्रयत्न करा. इतरांसाठी हा आठवडा आरोग्यदायी आहे. मात्र म्हणून आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम करा  तसेच आरोग्यदायी आहाराकडे लक्ष द्यावे.

कर्क 

राशीतील ग्रहमानानुसार, आजारपण डोकं वर काढण्याची शक्यता आहे. व्हायरल इंफेक्शनपासून सावध रहा. पुरेशी काळजी न घेतल्यास सर्दी -पडशासारखे लहानसे आजारदेखील त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्याकडे लक्ष द्या. योग्य वेळी औषधं घ्या.

सिंह 

या आठवड्यात अनपेक्षितपणे अपघात / इजा  होण्याची शक्यता आहे. तणावग्रस्त  स्थितींपासून दूर रहा. वाढत्या वयानुसार काही समस्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करा. किमान संध्याकाळी नियमित चालण्याची सवय  लावा.

कन्या 

पचनासंबंधीच्या आजाराबाबत सावध रहा. यावर वेळीच उपाय न केल्यास हे आजार तुम्हांला दीर्घकाळ त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे आजार लहान असतानाच त्यावर उपाय करा. व आरोग्याबात थोडी विशेष काळजी घ्या.

तूळ

या आठवडा तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरणार आहे. मात्र अनपेक्षितपणे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहण्यचा प्रयत्न करा. ज्या व्यक्ती लहान पण जुन्या आजारांशी झगडा करत आहेत अशांनी योग्य उपचार घ्यावेत.

वृश्चिक 

तुमच्या राशीचे ग्रहमान आरोग्यास अनुकूल नाही. ऋतूमानात झालेल्या बदलांमुळे तुम्ही आजारी पडण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे शरीराकडून मिळणर्‍या संकेताकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करा. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास तुम्हांला रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावे लागतील.

धनू 

सर्दी,पडसं, खोकला असे आजार या आठवड्यात तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. पचानाच्या विकाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घ्यावेत अन्यथा तुम्हांला काही दिवस अंथरुणात पडून रहावे लागेल.त्यामुळे नियमित ध्यान व योग साधना करा.

मकर

तुम्ही काही नव्या औषधांनी जुनाट आजारांवर नियंत्रण मिळवाल. इतरांसाठी हा आठवडा आरोग्यदायी ठरेल. निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित व्यायाम करण्याची सवय लावा. आरोग्याची हेळसांड करू नका.

कुंभ

मंदावलेल्या पचनशक्तीकडे दूर्लक्ष न करता योग्य उपचारांनी काबूत ठेवा. वेळेवर व्यायाम व पोषक आहार  घेण्याची सवय लावा. यामुळे तुम्ही फीट आणि फाईन रहाल. काही अपघातांनी इजा होण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या.

मीन 

व्हायरल इन्फेकशनमुळे या आठवड्यात तुमची तब्येत नाजूक राहील. त्यामुळे  योग्य उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.  रक्तदाबाची  समस्या  असलेल्यांनी  ताण-तणावापासून  दूर  राहून  मन  शांत  व स्थिर  ठेवा.  इतरांनीदेखील  निरोगी  स्वास्थ्यासाठी आवश्यक  गोष्टींकडे लक्ष  द्यावे.

GaneshaSpeaks-Logo1

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>