लवकर येणारी पौगंडावस्था मुलांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण करते कारण अशा परिस्थितीत मुले त्यांच्यामधील शारिरीक व भावनिक बदल स्विकारण्यास मानसिकरित्या सक्षम नसतात.आपण नेहमी म्हणतो मुलं भराभर मोठी होतात.हे काही बाबतीत खरे जरी असले तरी मुलांमध्ये लवकर येणारी पौगंडावस्था ही चिंतेची बाब आहे.
Supraja Foundation and Ashvini IVF Center, Mumbai च्या pediatrician डॉ.गीतांजली शाह यांच्या मते,’आजकाल मुलांमध्ये सात ते आठ या वयातच पौगंडावस्था येत असल्याने ही पालकांसाठी व आरोगतज्ञांसाठी मोठी चिंतेची बाब ठरत आहे.मुले लवकर वयात येत असल्याने त्यांच्यामधील हॉर्मोन्समध्ये होणारे शारिरीक व भावनिक बदल समजुन घेताना त्यांचा पुरता गोंधळ उडतो.’ तारुण्यावस्था लवकर आल्याने मुले त्यांच्या ख-या वयापेक्षा अधिक मोठी होतात.अशावेळी एक पालक म्हणुन तुम्ही मुलांसाठी बरेच काही करु शकता.
डॉ.शाह यांच्या मते पौगंडावस्था लवकर येण्याची पाच कारणे व त्यावर मात करण्याचे काही उपाय-
१. लठ्ठपणा व अतिवजन-
लठ्ठपणा हे पौगंडावस्था लवकर येण्याचे व त्याबद्दलच्या चिंतेचे महत्वाचे कारण असु शकते.डॉ.शाह यांच्या मते, ‘जर तुमच्या मुलाची उंची व वजन प्रमाणाबाहेर वाढत असेल तर हे पौगंडावस्थाचे पहिले लक्षण आहे.त्यात अतिवजन असणे अधिकच भर घालते.यासाठी तुमच्या मुलांच्या BMI वर लक्ष ठेवा त्याचे वजन जर प्रमाणापेक्षा अधिक वाढत असेल तर ते लठ्ठपणाचे लक्षण असु शकते.तसेच शरीरात होणारे हॉर्मोनल बदल देखील पौगंडावस्था लवकर येण्याचे एक कारण असु शकते.’ शरीरात वाढलेल्या चरबीमुळे शरीरातील एस्ट्रोजीनची पातळी,इन्सुलिन व लेप्टीन मध्ये बदल होऊन पौगंडावस्था लवकर येते. डॉ.शाह यांच्या सल्यानुसार, ‘लठ्ठपणा टाळण्यासाठी मुलांना प्रेमाने आठवड्यातून कमीतकमी तीनदा तरी ३५ मिनीटे आऊटडोअर एक्टिव्हिटीज साठी प्रोत्साहन द्या.’ हे नक्की वाचा वजन कमी करायचं ? मग करा योगसाधना
२. प्रदुषित वातावरण-
प्लॅस्टिकच्या डबे,फुड कॅनमधील आतील आवरण,पाण्याच्या बाटल्यांची झाकणे यांच्यातील केमिकल अन्नामध्ये उतरते व पर्यायाने शरिराची हानी करते.संशोधनात असे आढळले आहे की, अश्या पदार्थांच्या अति वापरामुळे मुलींमध्ये पौगंडावस्था लवकर येते. सौदर्यप्रसाधनात वापण्यात येण्या-या Phthalates या केमिकलमुळे तसेच हेअर स्प्रे व डिओड्रन्टसमुळे मुलींच्या स्तनांमध्ये वयाआधी वाढ होते जी त्यांच्यासाठी हितकारक नाही.
३. जंक फुड चे अतिसेवन-
जंक फुड चे अतिसेवन लहानपणीच लठ्ठपणा येण्याचे महत्वाचे कारण आहे.यातील मोठ्या प्रमाणावर असणारे एनिमल फॅट इन्शुलिन व IGF-1 ची वाढ करते ज्यामुळे पौगंडावस्था लवकर येते.असे पदार्थ खाण्याचे प्रमाण तीन ते सात वयातील मुलांमध्ये अधिक आहे.याउलट भाज्यांमधील प्रथिनांमुळे मुले योग्य वेळी वयात येतात व त्यांचे आरोग्यही निरोगी राहते.याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही मुलांना मीट अजिबात खाण्यास देऊ नका.मात्र ते रेड मीट व प्रोसेस मीट खाणार नाहीत याची काळजी घ्या.आठवडयातुन दोनदा किंवा तीनदाच त्यांना असे पदार्थ खाण्याची परवानगी द्या. जाणून घ्या घातक ‘जंकफ़ूड’ला आत्ताच दूर करण्याची ’10′ कारणे
४. हॉर्मोनल बदल-
डॉ.शाह यांच्या मते, ‘समाज व माध्यमे देखील लवकर पौगंडावस्था येण्याचे कारण असु शकतात.समाजात सतत होणारा हिंसाचार,पौढांसाठी असलेल्या वस्तुंचे जाहीर प्रदर्शन या सर्वांचा मुलांच्या मेंदुवर विशेषत: pituitary gland वर परिणाम होतो.या ग्रंथीतुन gonadotropins पाझरते.ज्यामुळे पुढे testicles किंवा ovaries मध्ये testosterone आणि estrogen हे सेक्स हॉर्मोन्स निर्माण होण्यास चालना मिळते व त्यामुळे पौगंडावस्था लवकर येते.’ हे नक्की वाचा मासिकपाळीच्या पहिल्या अनुभवाअगोदर मुलींना या ’5′ गोष्टी नक्की सांगा !.
५. कुपोषण-
डॉ.शाह यांच्या मते, ‘काही मुले शांतपणे व व्यवस्थित जेवत नाहीत म्हणुन मग पालक त्यांना त्यांच्या आवडीचे साखरयुक्त व तळलेले पदार्थ खाऊ देतात.त्यामुळे त्यांचे पोषण व्यवस्थित होत नाही परिणामी हॉर्मोमल सायकल विस्कळीत होते व त्यांना लवकरपौगंडावस्था येते.
थोडक्यात सांगायचे तर मुलांना निरोगी ठेवा.त्यांना त्यांच्या वयानुसार वाढण्यास मदत करा.त्यांना शक्य तेवढा पुरेसा पोषक आहार,मुबलक सुर्यप्रकाश,रोज मायेचा स्पर्श व आनंद द्या.’
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock