महिला नेहमीच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.आजच्या धकाधकीच्या काळात महिलांना नोकरी/काम व घर अशा दोन्ही जबाबदा-या सांभाळाव्या लागतात.निरोगी व सुरक्षित आयुष्यासाठी महिलांनी त्यांची नियमित आरोग्य तपासणी करुन घेणे खुप गरजेचे आहे.
Breach Candy, Jaslok and Global Hospitals च्या consulting panelist आणि Gynaecworld च्या director डॉ. दुरु शहा यांचे रेग्युलर हेल्थ चेकअप याबाबत काही महत्वाचे सल्ले.
१. गरोदरपण वयाच्या ३५ व्या वर्षाआधी असावे.
महिलांमध्ये स्त्रीबीजकोषामध्ये(ओव्हरीज) असणा-या स्त्रीबीजांची संख्या त्यांच्या जन्मापासुन ठरलेली असतात.ही स्त्रीबीजे संपली की स्त्रीची मेनोपॉज ही अवस्था सुरु होते.मेनॉपॉज सुरु होण्याच्या १० वर्षे आधीच तिची जननक्षमता (फर्टिलिटी) हळुहळु कमी होत शेवटी संपुन जाते.पाश्चांत्यांपेक्षा भारतीय महीलांमध्ये ५ वर्षे आधी म्हणजे वयाच्या ४८ व्या वर्षी मेनॉपॉज ही अवस्था येते.वंधत्वासारख्या समस्या टाळण्यासाठी भारतीय वंशपरंपरेत महिलांना ३५ वर्षांआधीच मातृत्व स्विकारण्याचा सल्ला दिला जातो.
२. स्त्रीबीजे गोठवण्याचे योग्य वय-
अनेकदा करियर करणा-या महिलांना मातृत्वाची जबाबदारी पुढे ढकलायची असते किंवा योग्य जोडीदार न मिळाल्यास काही महिला सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतात. अशावेळी त्यांनी आपली स्त्रीबीजे वयाच्या ३० ते ३५ व्या वर्षीच गोठवून ठेवावीत.कमी वयात स्त्रीबीजे चांगल्या दर्जाची असतात मात्र पस्तिशीनंतर स्त्रीबीजाचा दर्जा खालावतो व त्यामुळे 20-30 या वयातच सुदृढ बाळासाठी प्रयत्न करावेत.
३. पी.सी.ओ.डी फक्त लठ्ठपणा,पुरळ व मासिक पाळीशी निगडीत नाही.
पोलिसिस्टीक ओव्हरीयन सिन्ड्रोम(पी.सी.ओ.डी) ची लक्षणे फक्त पुरळ,चेह-यावरील अनावश्यक केस,लठ्ठपणा व अनियमित मासिक पाळी असल्यासच दिसत नाहीत तर पी.सी.ओ.डी चा त्रास मॅनोपॉज नंतरही जाणवतो.मेटॉबॉलिकसिन्ड्रोम(metabolic syndrome),कार्डियोव्हॅस्क्युलर डिसीज(cardiovascular disease),लठ्ठपणा आणि कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी आरोग्याबाबत योग्य ते उपाय आधीच करणे गरजेचे आहे.यासाठी तुमच्या गायकॉलॉजिस्टकडे रेग्युलर चेकअप करुन घ्या व तुमची जीवनशैली निरोगी ठेवा. जाणून घ्या दर महिन्याला मासिकपाळी लवकर येण्यामागील कारण काय ?
४. सुरक्षित सेक्स-
लग्नापुर्वी शरीर संबंध ठेवणे अयोग्य नाही मात्र निरोगी आयुष्यासाठी योग्य ती काळजी घेणे मात्र गरजेचे आहे.अनावश्यक प्रेगन्सी व सेक्स इनफेक्शन टाळण्यासाठी शरीर संंबंध ठेवताना योग्य ती सुरक्षा जरुर बाळगा. हे नक्की वाचा ‘सुरक्षित सेक्स’चा नेमका काळ कोणता?
५. डीएनए चाचणी-
तुमचे बाळ हे खरेच तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आहे का हे जाणुन घेण्यासाठी डीएनए चाचणी करणे आता सुलभ झाले आहे.
६. गायकॉलॉजिस्टकडे रेग्युलर चेकअप-
गायकॉलॉजिस्टकडे जाण्यासाठी फक्त तुम्हाला बाळ हवे असण्याची किंवा तुम्ही गरोदर असण्याची आवश्यक्ता नाही.तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक व निरोगी असावे यासाठी तुम्ही तुमच्या गायकॉलॉजिस्टकडे रेग्युलर हेल्थ चेकअप करुन घ्या.
७. प्रेगन्सी ही एक नैसर्गिक व शारिरीक अवस्था आहे-
प्रेगन्सी ही एक नैसर्गिक व शारिरीक अवस्था असल्याने तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्यानुसार तिचा आनंद नक्कीच घेऊ शकता.यासाठी चिंता काळजी करण्याची काहीच गरज नाही.
८. योनीमार्गाची स्वच्छता-
योनीमार्गाच्या स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष करु नका कारण त्यामुळे योनीमार्गात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.योनीमार्गाचे इनफेक्शन टाळण्यासाठी तुम्ही वापरत असलेले टेम्पॉन्स दर सहा तासांनी बदला. हे नक्की वाचा खोबरेल तेल – योनीमार्गातील शुष्कता कमी करण्याचा हमखास घरगुती उपाय
तुमच्या गायकॉलॉजिस्टकडे रेग्युलर हेल्थ चेकअप करुन घ्या आणि सुरक्षित व निरोगी आयुष्य जगा.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock