Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

‘वजनदार’साठी सई ताम्हणकर आणि प्रिया बापटने कशी घेतली मेहनत

$
0
0

सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांंचा वजनदार चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. आपल्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी कलाकार अनेक प्रकारे प्रयत्न करतात. मात्र वजनदार चित्रपटासाठी सई ताम्हणकरने सुमारे 10 किलो तर प्रिया बापटने तब्बल 16 किलो वजन वाढवले आणि यशस्वीरित्या कमीदेखील केले. नक्की वाचा वजन वाढवण्यासाठी मास गेनर्सचा पर्याय निवडणे योग्य आहे का ?

सुंदर म्हणजे गोरीपान, सुडौल बांध्याची देखणी स्त्री असे काही समज आपल्या मनात असतात आणि परिणामी त्यातून प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीतीच्या मनात काहीना काही न्युनगंड निर्माण होतात. मात्र अशाच न्युनगंडावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे वजनदार. या चित्रपटासाठी वजन वाढवण्यासाठी घेतलेली खास मेहनत सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी एका खास व्हिडीयो मधून रसिकांंसोबत शेअर केली आहे.

एरवी डाएट आणि वजन सांभाळताना अनेक पदार्थ इच्छा असूनही खाता येत नाही असे सारे पदार्थ वजनदारसाठी वजन वाढवताना खाल्ल्याचे सई आणि प्रिया सांगतात. पुरणपोळी, श्रीखंड, मिल्कशेक पासून बिर्याणीपर्यंत सारेच पदार्थ खाण्याची सई आणि प्रिया यांना मुभा होती. वजनदार सिनेमासाठी सई आणि प्रियाचे बॉडी ट्रान्सफॉरमेशन हे सेलिब्रिटी फीटनेस ट्रेनर शैलेश परुळेकर आणि जीम ट्रेनर अब्बास यांच्या देखरेखी खाली  झाले. पण तुम्हाला आरोग्यदायी पद्धतीने वजन वाढवायचे 10 ‘हेल्दी उपाय ‘ ठाऊक आहेत का ?

 

वजन वाढवणं ही प्रक्रिया जितकी कष्टाची होती तितकीच मेहनत प्रिया बापटने ते घटवताना केली. यासरम्यान  नियमित व्यायाम करून केवळ बारीक होण्याकडे नव्हे तर अधिक फीट राहण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला आहे. जिम आणि डाएटशिवाय घटवा दिवसभरात 500 कॅलरीज !

प्रिया बापटचा खास सल्ला जाणून घेण्यासाठी पहा हा खास व्हिडियो

 

नुकतेच प्रिया आणि सईने पुण्यातील पिकाथॉनमध्येही सहभाग घेऊन 10 किलोमीटरचा पल्ला सुमारे 1 तास 16 मिनिटांत पूर्ण केला. यासाठी मिलिंद सोमणने त्यांना खास ट्रेनिंग आणि टीप्सही दिल्या होत्या.

Video source – Yotube & Facebook

Image source – Priya Bapat / facebook


Viewing all articles
Browse latest Browse all 1563


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>