Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Hypothyroidism चा त्रास फर्टिलिटीवर कशाप्रकारे परिणाम करतो ?

$
0
0

शिक्षण,त्यानंतर करियरमागील धावाधाव आणि त्यामध्ये स्थैर्य मिळवण्यासाठी होणारी धावपळ यामुळे आजकाल तरूणाई बाळाचा विचार थोडा उशीराच  करते. वयाच्या तिशीनंतर बाळाचे प्रयत्न करताना तुमच्यामध्ये असलेल्या वंध्यत्वाबाबतही माहिती उशिरा मिळते. वर्षभर बाळासाठी प्रयत्न करूनही ते असफल ठरत असतील तर कदाचित त्यामागे हायपोथायरॉईडीझमचा त्रास असण्याची शक्यता असते. म्हणूनच स्त्रीरोगतज्ञ डॉ. अरुधंती धर यांनी हायपोथायरॉईडिझम  तुमच्या फर्टिलिटीवर कशाप्रकारे परिणाम करते याबाबत दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.

स्त्री शरीरामध्ये थायरॉईड ग्रंथी जेव्हा पुरेशा प्रमाणात थायरॉईड हार्मोन्सची निर्मिती करू शकत नाहीत तेव्हा हायपोथायरॉईडीझमचा त्रास वाढतो. त्याचा शरीरावर अनेकप्रकारे परिणाम होतो. स्त्रीच्या पुनरुत्पादनक्षमतेवरही परिणाम होतो. यामुळे बाळासाठी केले जाणारे प्रयत्न अयशस्वी ठरतात. थायरॉईड हार्मोन्सचा परिणाम स्त्रियांच्या ऑव्ह्युलेशनवर होतो. शरीरात थायरॉईड हार्मोन्स कमी असल्याने ओव्हरीज मधून म्हणजेच स्त्रीबीज कोषामधून (progesterone) प्रोजेस्टेरॉन कमी प्रमाणात तयार होतात. यामुळे premenstrual syndrome( PMS) चा त्रास होतो. स्त्रियांमध्ये या ’5′ समस्या कमी करतात त्यांची आई होण्याची शक्यता !

पुरूषांमध्ये हायपोथायरॉईडिझम फारसा आढळत नसल्याने त्याचा पुरूषांमधील इन्फर्टिलिटीवर त्याचा तितकासा परिणाम होत नाही. मात्र ज्या पुरूषांमध्ये अंडरअ‍ॅक्टीव्ह थायरॉईड असतील त्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असू शकते. त्यामुळे कामवासनाही कमी होते. तसेच हायपोथायरॉईडीझम स्त्री आणि पुरूषांमध्येही सुस्तपणा, थकवा वाढवते.

हायपोथायरॉईडिझमची लक्षणं

हायपोथायरॉईडिझमची लक्षणं प्रत्येक माणसागणिक वेगवेगळी असतात. काहींमध्ये हा त्रास वाढत असला तरीही कोणतेही लक्षण ठळक दिसत नाही.काहींमध्ये हायपोथायरॉईडिझमची लक्षण स्पष्ट दिसून येतात. या ’7′ कारणांमुळे वाढतो थायरॉईडचा धोका

मात्र हायपोथायरॉईडिझमची काही सामान्य लक्षण -

तुमच्यामध्ये ही लक्षणं आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बाळाचा विचार करताना हायपोथायरॉईडिझमचा त्रास असल्यास त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाचा विचार करा. Hypothyroidism चा त्रास कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन नक्की आहारात ठेवा

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>