अनेकजण जखम स्वच्छ करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा अल्कोहलचा वापर करतात. काहींना वाटते की, जखम उघडी ठेवल्यास ती लवकर भरते तर काहींच्या मते, नैसर्गिक उपायांनी जखम लवकर भरता येते. परंतू जखमेवर अल्कोहल वापरणे चूकीचेच आहे. त्याच्या फायद्यांपेक्षा नुकसानच अधिक होते. जखमेवर अल्कोहलचा वापर करणे कसे चूकीचे ठरते हे जाणून घेण्यासाठी फोर्टीस हॉस्पिटल्सचे कन्सलटंट फिजिशियन डॉ. प्रदीप शहा यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या. (नक्की वाचा : प्रत्येक जखमेवर बॅन्डेज लावणे सुरक्षित आहे का ?)
कापल्यामुळे एखादी जखम झाल्यास त्यावर अल्कोहलचा वापर केल्याने टीश्यूचे नुकसान होते तसेच जखम भरण्याची प्रकिया कमी मंदावते. अल्कोहलमुळे बॅक्टेरियल अॅक्टिव्हिटी वाढल्याने हेल्दी त्वचेचेदेखील नुकसान होते. जळजळ वाढते. परिणामी सूज , खाज, जळजळ आणि वेदना वाढण्याचा धोका असतो. अल्कोहल वैद्यकीय उपचारांसाठी वापरले जाते मात्र प्रामुख्याने त्याचा वापर इंजेक्शन आणि सर्जरीपूर्वी केला जातो. हायड्रोजन पेरॉक्सॉईडदेखील जखम स्वच्छ करण्यासाठी वापरणं त्रासदायक ठरू शकते. नक्की वाचा जखमांचे व्रण कमी करणारे ’8′ घरगुती उपाय !
जखम कशी स्वच्छ कराल ?
जखम स्वच्छ करण्यासाठी तीला वाहत्या पाण्याखाली धरा. जखम स्वच्छ करण्यासाठी तुम्ही अॅन्टीबॅक्टेरियल साबणाचा किंवा कोणत्याही माईल्ड सोपचा वापर करू शकता. पाण्याखाली जखम करताना त्याच्या जवळील घाण, कचरा स्वच्छ करा. पाण्याने जखम स्वच्छ केल्यानंतर टॉवेलने जखम स्वच्छ पुसावी. त्यावर अॅन्टीबायोटिक क्रीम लावा. परंतू जखम सतत वाहत असेल किंवा खोल असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हळद, बटर, कोरफड यासारखे नैसर्गिक उपाय केल्याने काही वेळेस जखम अधिक चिघळते किंवा त्रासदायक होऊ शकते. जाणून घ्या लहान-मोठ्या जखमांवर कसे कराल घरच्याघरी औषध ?
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock