श्वास हा आपल्या शरिरातील उर्जेचा महत्वाचा स्त्रोत आहे.योग्य पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दुर पिटाळतो.योगाभ्यासात केलेला प्राणायामाचा सराव तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवतो व तुमचे शरीर आणि मन संतुलित करतो.निरोगी आयुष्यासाठी तुम्ही हे प्राणायाम दिवसभरात कोणत्याही वेळी रिकाम्या पोटी करु शकता.
1. कपालभाती प्राणायम-
‘कपालभाती’ या संस्कृत शब्दाचा अर्थ – कपाल=कपाळ आणि भाती=ओजस्वी,प्रकाश.म्हणजेच बुद्धीला तेज आणणारे प्राणायामाचे तंत्र.हे तंत्र आपले शरीर व मन दोन्ही संतुलित ठेवण्यास मदत करते.या प्राणायामाच्या प्रकारात उच्छावासाद्वारे आपल्या शरीरातील ८० टक्के विषद्रव्ये (टॉक्सिन्स)बाहेर टाकली जातात.कपालभातीच्या नियमित सरावाने आपली बुद्धी तल्लख व तीक्ष्ण होते.या प्रकारामुळे शरीरातील आंतरिक अवयवांमध्ये उर्जा निर्माण होते.विशेषत:मधुमेहींना याचा अधिक फायदा होऊ शकतो.तसेच कपालभाती नियमित केल्याने चयापचय प्रक्रिया (मेटॅबॉलिझम) सुधारते सहाजिकच त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.रक्ताभिसरण सुधारल्याने चेह-यावर तेज निर्माण होते.
2. भस्रिका प्राणायाम-
भस्रिका प्राणायामात श्वास नाकावाटे आत घेऊन जलद गतीने बाहेर सोडला जातो.या प्रकारामुळे शरीरातील उर्जेची पातळी वाढते.या प्राणायमाचा फायदा असा की यामुळे शरीराला उर्जा मिळते तसेच नाक,घसा व सायनस मधील अडथळे दुर होतात.हा प्राणायामाचा प्रकार पोटविकार,अपचन,गॅसेस या त्रासांमध्येही लाभदायक ठरु शकतो.जलद गतीने केलेल्या श्वास-उच्छासामुळे पोटातील आतड्यांमधील हवेची पोकळी मोकळी होते.
3. शितली प्राणायाम-
शितली या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे थंड.शितली हा प्राणायामाचा प्रकार तुमच्या शरीराला थंडावा देतो.शितली प्राणायामात हवा तोंडावाटे आत घेतली जाते व नासिकांमार्फेत बाहेर सोडली जाते.जीभेवाटे श्वास आत घेतल्यामुळे शरीराला थंडावा मिळत त्यामुळे मध्यवर्ती मज्जासंस्था शिथिल होते.प्राणायामाच्या या प्रकारामुळे पोटशुळ,ताप,पित्तविकार तसेच चिडचिड कमी होऊ शकते.या प्रकाराच्या नित्य सरावाने उच्च रक्तदाब देखील नियंत्रित होतो.
4.नाडी शोधन प्राणायम-
नाडी शोधन प्राणायामात डाव्या व उजव्या नासिकेने आलटुन पालटुन श्वास घेतल्याने डाव्या व उजव्या मेंदूच्या कार्यात समतोल राखणे शक्य होते. ज्याचा आपल्या व्यक्तिमत्वातील तर्कशुद्ध तसेच भावनिक बाजुंशी संबध आहे.हा प्राणायामातील एक असा प्रकार आहे ज्यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो व रक्ताभिसरण सुधारते.या प्राणायामुळे शरिरातील ऑक्सिजन व कार्बनडायऑक्सईडचे प्रमाण सुधारते. त्यामुळे अशुद्ध रक्ताचा निचरा होऊन शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो.तसेच शरिरातील तापमानात समतोल राखण्यास मदत होते.
5.उज्जायी प्राणायाम-
या प्रकारात श्वास मंद गतीने घेतल्याने मन शांत होते.मंद श्वासामुळे शरिरातील लिम्बिक आणि पिच्युटरी (पिट्युटरी) प्रक्रिया कार्यक्षम होतात.ज्यामुळे चिंता,काळजी,ताणतणाव,नैराश्य या सारख्या समस्यांना सामोरे जाण्यास मदत होते.या व्यतिरिक्त डोकेदुखी,सायनस या सारख्या दुखण्यांवरही उज्जायी प्राणायाम फायदेशीर ठरते.हा प्रकार चिंता, काळजी दूर करण्यास व पचनसंस्था सुधारण्यास फायदेशीर ठरतो.
6.अनुलोम विलोम-
आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवी शंकर यांच्या सल्ल्यानुसार, अनुलोम विलोम हा प्राणायामातील असा एक प्र्कार आहे की ज्यामुळे मन शुद्ध होते, ताणतणावातून त्वरीत आराम मिळतो.या प्रकारामुळे अवयवांना संरक्षण मिळते व मज्जासंस्था बळकट होते.फुफ्फुसे निरोगी होतात व संपुर्ण शरीराला मुबलक ऑक्सिजनचा पुरवठा होतो त्यामुळे शरीराला आंतरिक थंडावा मिळतो.नियमितपणे केलेल्या या प्राणायामाच्या सरावाने मज्जासंस्थेला देखील आराम मिळतो. नक्की वाचा निरोगी स्वास्थ्यासाठी नियमित करा सूर्यनमस्कार !
7. भ्रामरी प्राणायाम-
भ्रामरी प्राणायामाचे नाव भारतातील काळ्या रंगाच्या भुंग्यावरुन दिले गेले आहे.कारण या प्रकारात श्वास बाहेर सोडताना भुंग्याप्रमाणे गुणगुण्याचा आवाज केला जातो.हा प्राणायाम उच्च रक्तदाब असणा-यांसाठी वरदान आहे.तसेच चिंता,काळजी त्वरीत दुर करतो व मनाला रिलॅक्स करतो.भ्रामरी प्राणायामाची मायग्रेन सारख्या डोकेदुखीत आपल्याला मदत होते.या प्रकाराच्या नियमित सरावामुळे रक्तदाब नियंत्रित होतो.यामुळे स्मरणशक्ती व एकाग्रता देखील वाढते. हे नक्की जाणुन घ्या मायग्रेनची डोकेदुखी कमी करणारे ‘भ्रमरी प्राणायम’ !
8. सुर्यभेदन प्राणायाम-
यामध्ये उजव्या नासिकेतून हवा फुफ्फुसात घेतली जाते व डाव्या नासिकेतून बाहेर सोडली जाते.या प्रकारामुळे संपुर्ण शारिरीक क्रिया सक्रीय व कार्यक्षम होण्यास मदत होते.रक्तातील ऑक्सिजनच्या अपु-या पुरवठ्यामुळे होणारे आजारही यामुळे बरे होतात.हा प्रकार नासिकांना स्वच्छ करतो आणि पोटातील जंतुचा नाश करतो.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock