तुमच्या मुलांचे दात वाकडेतिकडे असतील किंवा एखादा दात अर्धवट तुटलेला तुम्हाला दिसला की सर्वात प्रथम तुमच्या मनात मुलांना ब्रेसेस लावण्याचा विचार येतो.जर यासाठी तुम्ही डेंटिस्ट कडे जाणार असाल तर त्याआधी तुम्हाला ब्रेसेसचे प्रकार माहीत असणे गरजेचे आहे.
अपोलो हॉस्पिटल,बेंगलोर येथील रिजनल क्लिनीकल कोओर्डिनेटर,कनसल्टंट डेंटिस्ट डॉ.चंद्रमोहन राजू यांनी याबाबत दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
१.ब्रेसेस लावण्याचे योग्य वय कोणते?
मुलांमध्ये ब्रेसेस लावण्याचे १२ ते १३ वर्ष हे योग्य वय आहे.मात्र काही वेळा मुलांच्या दातांच्या रचनेनुसार ब्रेसेस लावण्यापुर्वीही काही उपचार पद्धती कराव्या लागतात.अशावेळी मुलांना ९ ते १० व्या वर्षीही ब्रेसेस लावण्यात येतात.यामुळे त्यांच्या ब्रेसेस लावुन ठेवण्याच्या कालावधीतही बदल होऊ शकतो.वाढत्या वयातील मुलांमध्ये ब्रेसेस लावणे फायदेशीर ठरु शकते.त्यामुळे अशावेळी मुलांच्या दातांतील एखाद्या समस्येवर डेंटिस्ट लहान वयातही ब्रेसेस लावण्याचा सल्ला देतात.
ब्रेसेसचे प्रकार व त्यांच्या किंमती ?
बाजारामध्ये तीन मुख्य प्रकारच्या ब्रेसेस उपलब्ध आहेत.
१.मेटल ब्रेसेस-
हि एक धातूपासुन तयार केलेली ब्रेसेस आहे.सामान्यत: मेटल ब्रेसेस मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.मुलांना या ब्रेसेसला कमीतकमी एक ते दिड वर्षे लावावे लागते.यासाठी अंदाजे २५,००० ते ३०,००० हजार खर्च येतो.मात्र हा खर्च एकदाच करावा लागतो.
२.सिरॅमिक ब्रेसेस-
या ब्रेसेस आकाराने मेटल ब्रेसेस प्रमाणेच असतात.फक्त त्यांचा रंग सफेद किंवा ट्रान्सफरंट असतो जो दातांच्या रंगात सहज मिसळतो. सिरॅमिक ब्रेसेसची किंमत ४०,००० ते ५०,००० हजार या दरम्यान असते.या ब्रेसेस लावण्याचा कालावधी एक ते दोन वर्ष असतो.मेटल ब्रेसेस प्रमाणेच सिरॅमिक ब्रेसेस ही सुरुवाती पासुन शेवटपर्यंत पुर्ण कालावधीत लावूनच ठेवाव्या लागतात.
३.इनविजीबल ब्रेसेस(अदृश्य ब्रेसेस)-
इनविजीबल ब्रेसेस लिंगग्वल ब्रेसेस व क्लियर ब्रेसेस अशा दोन प्रकारच्या असतात.
- लिंगग्वल ब्रेसेस - लिंगग्वल ब्रेसेस दातांच्या मागील बाजुने लावल्या जातात.त्यामुळे मेटल ब्रेसेस किंवा सिरॅमिक ब्रेसेस प्रमाणे त्या दातांवर पुढील बाजुने दिसत नाहीत. लिंगग्वल ब्रेसेसची किंमत ९०,००० ते १,१०,००० असते.
- क्लियर ब्रेसेस- क्लियर ब्रेसेसला रिमुवेबल ब्रसेस असेही म्हणतात. क्लियर ब्रेसेससाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जेवताना,ब्रश करताना त्या काढुन पुन्हा लावता येतात. क्लियर ब्रेसेस एख्याद्या ट्रान्सफरंट प्लॅस्टिक आवरणाप्रमाणे दिसतात.ट्रिटमेंट सुरु असताना या ब्रसेसचे अनेक सेट दिले जातात.दर दोन आठवडयांनी ते बदलणे गरजेचे असते. क्लियर ब्रेसेस भारतात तयार केल्या जात नाहीत. क्लियर ब्रेसेस महाग असतात. क्लियर ब्रेसेसची किंमत १.२० लाखांहुन अधिक आहे. हि किंमत उपचारानुसार असते.
डॉक्टरांकडे यासाठी किती वेळा जावे लागते ?
मेटल ब्रेसेस,सिरॅमिक ब्रेसेस,लिंगग्वल ब्रेसेस साठी मुलांना दर महिन्याला स्पेशलिस्टकडे घेवून जावे लागते.तर क्लियर ब्रेसेससाठी दर दोन ते तीन महिन्यांनी डेंटिस्टकडे जावे लागते.असे असले तरी क्लियर ब्रेसेस दिवसभरात कमीत कमी १८ ते २० तास लावून ठेवावीच लागते. हे नक्की जाणुन घ्या लहान मुलांचे दात काढल्यानंतर कशी घ्याल काळजी ?
काय खावे आणि काय टाळावे ?
मेटल ब्रेसेस,सिरॅमिक ब्रेसेस,लिंगग्वल ब्रेसेस लावल्यानंतर चॉकलेट सारखे चिकट किंवा सुक्यामेव्याप्रमाणे कठिण पदार्थ खाणे टाळावे. कारण त्यामुळे ब्रेसेस दातातून निघू शकतात.या व्यतिरिक्त आपण कोणतेही पदार्थ खाऊ शकता.ब्रेसेस काढल्यानंतरही तुम्ही लगेच कोणतेही पदार्थ खाऊ शकता.ब्रेसेससाठी मुलांना खाण्यावर कोणतेही बंधने नसतात. जाणून घ्या दात किडण्याची ही 10 लक्षणे
इतर बाबतीत कोणती काळजी घ्यावी ?
सामान्यत: तोंडातील स्वच्छता व ब्रेसेसची काळजी घ्यावी.प्रत्येकवेळी कोणताही खाद्यपदार्थ खाल्यास दात घासावे.दिवसभरात दोन वेळा दात घासताना डॉक्टरांनी सांगितलेल्या ऑर्थोडॉंटिक विशेष ब्रशचा वापर करावा.कायमस्वरुपी म्हणजेच मेटल ब्रेसेस किंवा सिरॅमिक ब्रेसेस वापरताना त्यांचा संबध तोंडातील आजुबाजुची त्वचा,हिरड्यांसोबत येतो त्यामुळे स्वच्छतेसाठी वारंवार गुळण्या कराव्यात. बाळाला दात येताना होणारा त्रास सुसह्य करणार्या 5 टिप्स ! नक्की जाणून घ्या.
Read this in English
Translated By – Trupti Paradkar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock