Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

व्यस्त जीवनशैलीतही कसे जपाल हृद्याचे आरोग्य

$
0
0

ऐन तारुण्यात किंवा अगदी चालता बोलता माणूस हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक  गेल्याचे वृत्त मन खिन्न करून जाते. हृद्यविकाराच्या झटक्याने रंगमंचावरूनच या कलाकारांनी घेतली अकाली ‘एक्झिट’ !!  आजकालची व्यस्त जीवनशैली, खाण्याच्या, झोपण्याच्या चूकीच्या सवयी आपल्यावरील ताण वाढवत आहेत. मग ते शिफ्टमध्ये काम करणारे कामगार असो किंवा 24 तास आपल्या संरक्षणासाठी झटणारे पोलीस असो किंवा अगदी सिनेजगतातील तारे-तारका. पण कामाच्या धावपळीत स्वतःकडे लक्ष न देण्याची सवय नकळत त्यांच्याभोवती अनेक आजारांचा विळखा वाढवते. म्हणूनच अशा व्यस्त वेळापत्रकात काम करणार्‍या सार्‍यांनीच हृद्याचे आरोग्य कसे जपावे याकरिता माधवबाग साने केअर्सचे संस्थापक आणि हृद्यरोगतज्ञ डॉ. रोहित साने यांनी दिलेल्या खास टीप्स नक्की जाणून घ्या.

हृद्यविकाराचा झटका कोणालाही, कुठेही, केव्हाही,कुणालाही आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यामागील कारण हे व्यक्तीसापेक्ष वेगवेगळे असू शकते. म्हणूनच हृद्यविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्यासाठी तसेच हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाने हार्ट अटॅक आल्यास त्या स्थितीत प्रतिकार करण्याची हृद्याची क्षमता सुधारणे गरजेचे आहे. नक्की वाचा :Heart attack आणि Cardiac arrest यामध्ये नेमका फरक काय असतो ?

हृद्यविकाराचा धोका आणि स्वास्थ्य  कसे ओळखावे ?

ह्रद्याचे आरोग्य जपण्यासाठी कोरोनरी रिझर्व्ह्ड योग्य असणे गरजेचे आहे. पुरेसा आणि योग्यवेळी केलेला व्यायाम हृद्याचे स्वास्थ्य सुधारण्यासाठी मदत करते. तसेच VO2Max चे प्रमाणही योग्य असणे आवश्यक आहे. VO2Max म्हणजे शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होणं. सामान्यतः पुरूषांमध्ये VO2Max चे प्रमाण 35ml/शरीराचे प्रतिकिलो वजन यापेक्षा अधिक तर स्त्रियांमध्ये 30 ml/शरीराचे प्रतिकिलो वजन यापेक्षा अधिक असणं गरजेचे आहे. त्याचे निदान स्ट्रेस टेस्टने करता येते.

VO2Max चाचणीच्या निष्कर्षावरून तुम्ही हृद्यविकाराचा झटका आल्यास त्याचा प्रतिकार करण्यासाठी हृद्य किती प्रमाणात तयार आहे याबाबत अंदाज बांधता येऊ शकतो. त्यानुसार तुमच्या आहारात, व्यायामात आणि एकुणच जीवनशैलीमध्ये बदल करणे सोयीस्कर ठरते.  Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे हे ’5′ संकेत मूळीच दुर्लक्षित करू नका.

  • हृद्याचे आरोग्य जपण्यासाठी काय कराल आणि काय टाळाल ?

# व्यायाम -

नियमित सकाळचा नाश्त्या करण्याची सवय ठेवा.तसेच त्यापूर्वी किमान अर्धा तास व्यायाम करा. यामध्ये प्रामुख्याने अ‍ॅरोबिक्स व्यायामप्रकारांना प्राधान्य द्या. योगासनं, प्राणायम, सायकलिंग, सूर्यनमस्कार,  जॉगिंग यांचा समावेश असावा. यामुळे हृद्याच्या स्नायूंना मजबुती मिळते. हृद्यरोगींनी हार्ट अटॅकनंतर योगा करणे सुरक्षित आहे का ? हे देखील जाणून घ्या.

#धुम्रपानाची सवय टाळा –

तरूणांमध्ये वाढणारा धुम्रपानाचे व्यसन कॅन्सरपासून सेक्स लाईफवर परिणाम करते. पण त्यासोबतच हृद्य कमजोर करते. धुम्रपानाचा धूर त्यांच्या अवतीभोवतीच्या व्यक्तींचेही आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते.

#मीठाचे प्रमाण –

आहारात अति मीठाचे,खारावलेले  पदार्थ खाऊ नयेत. 24 तासात केवळ 1.5 ग्राम सोडीयम शरीरात जाणे सुरक्षित आहे. तर पोटॅशियमचे प्रमाण हे ४५०० मिलिग्रॅमपेक्षा अधिक असू नये. या ’8′ मार्गाने नकळत आहारात वाढते मीठ !

# B12 आणि व्हिटॅमिन D3 ची पातळी खालावणेदेखील त्रासदायक ठरू शकते.

# अति कार्बोहायड्रेटयुक्त आहार टाळा  -  

केवळ फॅटी फूड खाल्ल्याने हृद्यविकाराचा धोका वाढतो असे तुम्हांला वाटत असल्यास हा तुमचा गैरसमज आहे. फॅटयुक्त पदार्थांप्रमाणेच अति कार्बोहायड्रेटयुक्त आहारही त्रासदायक ठरतो. आहारातून मिळणार्‍या कॅलरीजचे प्रमाण वाढल्यास ते त्रासदायक ठरते.

छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>