पिंपलचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपाय, उत्तम फेसवॉश वापरणे यासारखे सारे खटाटोप करता. परंतू अनेकांमध्ये विशिष्ट काळानंतर पुन्हा त्याच जागी पिंपल येण्याची समस्या आढळून येते. पिंपल्सचे चेहर्यावर त्याच त्याच जागी पुन्हा येणं यामागील नेमकं काय याबद्दलचा खास सल्ला डरमॅटोलॉजिस्ट डॉ. सेजल शहा यांनी दिला आहे.
त्वचेच्या खाली वाढणारे पिंपल्स अनेकदा त्वचेवर दिसत नाही. त्वचेवरील छिद्रांमधून जेव्हा तेल बाहेर पडण्याची प्रक्रिया वाढते तेव्हा सूजही वाढते. त्वचेच्या खाली तेलामुळे गोलाकार फुगवठा निर्माण होतो. त्याचे प्रमाण तेलावर अवलंबून असते. नक्की वाचा : अॅक्ने, ब्लॅकहेडचा त्रास दूर करण्यासाठी कसा कराल मुलतानी मातीचा वापर
तसेच तुम्हांला सतत चेहर्याला हात लावण्याची सवय असेल तर पुन्हा त्याच जागी अॅक्ने वाढण्याचा धोका अधिक असतो. सतत चेहर्याला हात लावण्याच्या सवयीमुळे चेहर्यावरील मळ, तेल पुन्हा छिद्रांमध्ये ढकलला जातो. यामुळे पिंपल्सची वाढ अधिक प्रमाणात होते. नक्की वाचा : ‘ओव्हरनाईट’ पिंपल हटवण्याचा हमखास घरगुती उपाय
- पिंपलचा त्रास कमी करण्यासाठी काय कराल ?
पिंपलमध्ये पस निर्माण झालेला असल्यास त्याला फोडण्याचा मोह टाळा. त्याला सतत हात लावू नका. ते आपोआपच कमी होण्यासाठी थोडा वेळ द्या. किंवा डरमॅटोलॉजिस्टचा सल्ला घ्या. अनेकदा पिंपल फोडल्यानंतरही त्यातील सारा पांढरा भाग / पस बाहेर पडत नाही. त्यामुळे पुन्हा त्याजागी पिंपल वाढण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच चेहरा पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी salicylic acid युक्त फेसवॉशचा वापर करा. यामुळे अतिरिक्त तेल काढण्यास मदत होते. benzoyl peroxide चा समावेश असलेल्या उत्पादनांची निवड केल्यास तवचे वर वाढणारे आणि अॅक्नेच्या निर्मितीला कारणीभूत ठरणार्या बॅक्टेरियांचा प्रभाव कमी करण्यास मदत होते.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock