Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

ग्लुटन फ्री थालिपीठ रेसिपी

$
0
0

महाराष्ट्रीय नाश्त्यामध्ये प्रामुख्याने आढळणारा एक पदार्थ म्हणजे थालीपीठ. अनेक धान्यांच्या भाजणींमधून थालीपीठाचे पीठ बनवले जाते. अनेक पोषकघटकांचा समावेश असलेले थालीपीठ खुसखुशीत नाश्ताला पोटभरीचा पर्याय असतो. मात्र  ग्लुटन सेंसिव्हिटीचा त्रास असणार्‍यांमध्ये असे नेहमीचे थालीपीठ खाणे थोडे त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच ग्लुटन फ्री डाएटचा समावेश असणार्‍यांसाठी ही थालीपीठाची खास रेसिपी

ग्लुटनचा त्रास असणार्‍यांमध्ये तसेच celiac disease चा त्रास असणार्‍यांमध्ये पोषणयुक्त आहार नेमका काय द्यावा असा प्रश्न सतावत असतो. म्हणूनच P.D. Hinduja Hospital & MRC, च्या डाएटीशन टीमने ग्लुटन फ्री थालिपीठाची खास रेसिपी शेअर केली आहे. थालीपीठाची भाजणी ग्लुटन फ्री करण्यासाठी गव्हाच्या पीठाऐवजी ज्वारी आणि बाजरीच्या पीठाचा समावेश करा. ज्वारी, बाजरीच्या पीठातील फायबर घटक पचन सुधारण्यास मदत करतात.

मग नक्की पहा कसे कराल हे खास ग्लुटन फ्री थालीपीठ -

साहित्य

  • बेसन पीठ  – 3 टीस्पून
  • ज्वारी पीठ   – 3 टीस्पून
  • बाजरी किंवा नाचणी किंवा तांदळाचे पीठ  – 3 टीस्पून
  • एक बारीक चिरलेला कांदा
  • एक बारीक चिरलेला टोमॅटो
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – 2 टीस्पून
  • दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • चवीपुरता मीठ
  • तीळ –  1टीस्पून
  • तेल – 2 टीस्पून

कृती

  1. सारे साहित्य एका बाऊलमध्ये एकत्र करून त्यामध्ये पाणी मिसळा. मिश्रणाचा घट्ट गोळा बनवा.
  2. नॉन स्टीक तवा गरम करा.
  3. थालीपीठ थापून तव्यावर घालावेत.
  4. त्यामध्ये छिद्र करून त्यातून थोडे तेल आत सोडावे.
  5. थालीपीठ गरमागरम खाण्यातच खरीच मज्जा असते. त्यामुळे हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत तुम्ही आस्वाद घेऊ शकता. ( तुम्हाला ठाऊक आहे, एका चपातीत किंवा भाकरीत किती कॅलेरिज असतात ?)

थालिपीठाप्रमाणेच ’6′ अस्सल मराठमोळे आणि हेल्दी पदार्थ ! नक्की चाखून पहा 

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>