Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Heart attack आणि Cardiac arrest यामध्ये नेमका फरक काय असतो ?

$
0
0

आजकाल व्यस्त जीवनशैलीमुळे तरुणांपासून वयोवृद्धांमध्ये हृद्यविकार जडण्याचे प्रमाण वाढते आहे. गेल्या ४-५ दिवसांमध्ये अशाच हृद्यविकाराच्या झटक्यामुळे महाराष्ट्रातील तीन उमदे चेहरे काळाच्या पडद्याआड गेले. अवघ्या 23 वर्षांचा आरजे शुभम केचे असो किंवा भरत नाट्य मंदिरात ‘नाट्यत्रिविधा’ कार्यक्रमादरम्यान गिरकी घेऊन कोसळलेली अभिनेत्री अश्विनी एकबोटे असो. ऐन उमेदीच्या काळात हृद्यविकाराने त्यांचे जाणे मनाला चटका लावणारे ठरले आहे. हृद्यविकाराच्या झटक्याने रंगमंचावरूनच या कलाकारांनी घेतली अकाली ‘एक्झिट’ !!

हद्यविकार म्हणजे केवळ हार्ट अटॅक नव्हे. तर काही वेळेस कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळेदेखील मृत्यू ओढावू शकतो. पण मग कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे नेमके काय हे नक्की जाणून घ्या .

कार्डिअ‍ॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅक यामध्ये फरक काय ?  

  • कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक स्थिती असते. ज्यामध्ये हृद्याचे पंपिंग होणं आणि रक्ताभिसरणाचे कार्य थांबते. अनेकदा हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यामध्ये लोकांची गफलत होते. रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजेसमुळे हृद्याला रक्तपुरवठा करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येऊ शकतो. परिणामी हार्ट अटॅक येतो.
  • कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये रक्तप्रवाहादरम्यान शरीरात इतर अवयवांना ऑक्सिजन पुरवण्याच्या कार्यात अडथळा येतो.मेंदूला ऑक्सिजनच्याअभावी त्याच्या कार्यातही अडथळा येतो. अशावेळेस श्वासावरील नियंत्रण सुटते, शुद्ध हरपते.
  • कार्डिअ‍ॅक अरेस्ट ही एक ‘मेडिकल इमरजन्सी’ असून त्यावर तात्काळ उपचार करणे गरजेचे असते. प्रामुखाने अशावेळेस रुग्णाला Cardio Pulmonary Resuscitation (CPR) सोबतच ठराविक इलेक्ट्रिक शॉक दिला जातो.

हृद्याच्या अनेक विकारांमुळे कार्डिअ‍ॅक अरेस्टचा धोका वाढतो. म्हणूनच हृद्यविकाराचा धोका वाढवणार्‍या या भारतीय खाद्यसंस्कृतीतील काही त्रासदायक सवयी तुम्ही नक्की बदला.

कार्डीअ‍ॅक अरेस्टची काही लक्षण - 

अचानक चक्कर येणं,

थकवा जाणवणं,

डोळ्यासमोर अंधारी येणं,

छातीत वेदना जाणवणं,

दम लागणं

कार्डीअ‍ॅक अरेस्ट हा अनेकदा कोणतेही लक्षण किंवा संकेत न देता येऊ शकतो म्हणूनच स्वतःची थोडी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.तसेच Heart attack चा धोका वेळीच ओळखण्याचे हे ’5′ संकेत मूळीच दुर्लक्षित करू नका.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>