भारतीय स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर उपचार करूनही तो उलटण्याचा धोकादेखील असतो. मात्र वेळीच वैद्यकीय सल्ला, नियमित चाचण्या आणि स्क्रिनिंग केल्याने हा धोका कमीदेखील करता येऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर परतण्यामागे तो कोणत्या स्थितीतील आहे. हेदेखील जाणून घेणे गरजेचे असते. त्यानुसार त्याची उपचारपद्धती ठरविता येते. म्हणूनच Jaypee hospital and National President, ICanWin Foundation चे Additional Director, Cancer Surgeon डॉ. पवन गुप्ता यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या. (नक्की वाचा : ब्रेस्ट कॅन्सरवर मात करून अनेकींना प्रेरणा देणार्या उज्ज्वला राजेंचा कणखर प्रवास !)
- ब्रेस्ट कॅन्सर परतल्याचा धोका कसा ओळखाल ?
पूर्वी आढळलेल्या जागीच पुन्हा त्रास जाणवू शकतो. स्तनाचा विशिष्ट भाग किंवा काही अंध काढला तरीही हा त्रास पुन्हा उद्भवू शकतो.पुन्हा गाठ जाणावणं, स्तनाजवळील त्वचा जाडसर वाटणं, स्तनाजवळील जागेतील पाणी बाहेर येणं अशा लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. स्तन काढून टाकले असल्यास मानेजवळच्या भागाकडे गाठ जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. ( नक्की वाचा : ब्रेस्ट कॅन्सरशी धैर्याने सामना करण्यासाठी खास ’10′ टीप्स !)
अनेकदा ब्रेस्ट कॅन्सर पलटल्यास तो जुन्या जागी न आढळता शरीरात इतर ठिकाणी जाणवतो. कॅन्सरच्या पेशी प्रामुख्याने फुफ्फुस, हाडं, मेंदू, यकृत याठिकाणी आढळतो. नियमित फॉलोअप आणि चाचण्या केल्यानंतर त्याला वेळीच ओळखणं सोपे होते.
फुफ्फुस : यामध्ये कॅन्सर पलटत असल्यास दम लाग्णे, छातीत दुखणे, खोकला वाढणे, खोकताना वेदना होणं असा त्रास जाणवू शकतो
यकृत : यामध्ये कॅन्सर वाढत असल्यास वजन कमी होणे, भूक मंदावणे अशी लक्षण आढळतात.
हाडं : हाडांमध्ये कॅन्सर पसरत असल्यास विविध सांध्यांमध्ये तीव्र वेदना जाणवतात.
मेंदू: या ठिकाणी कॅन्सर वाढत असल्यास डोकेदुखी, उलट्या, गरगरणे, भान हरपल्यासारखे वाटणे अशा समस्या वाढतात.
कॅन्सरचा विळखा वाढू नये म्हणून आहारात, जीवनशैलीत सकारात्मक बदल करा. तसेच नियमित चाचण्या आणि फॉलोअप करण्यामध्ये दिरंगाई करू नका. तसेच ब्रेस्ट कॅन्सर पलटल्याचे किंवा शरीरात इतरत्र पसरल्याचे जाणवल्यास लोकलाईज्ड सर्जरी, हॉर्मोनल थेरपी, केमोथेरपी, रेडिएशन थेरपीची मदत घेण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण वेळीच ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ओळखण्यासाठी करा ‘सेल्फ ब्रेस्ट एक्झाम’
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock