Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

मधूमेहींसाठी खास हेल्दी टेस्टी पायनॅपल बासुंदी

$
0
0

कोणताच भारतीय सण हा गोडा-धोडाच्या पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. पण सतत गोड खाणं किंवा सणावारांच्या नावाखाली आहाराची पथ्यपाणी टाळणं हे मधूमेहींना शक्य नसते. पण मधूमेहाचा आजार हा तुमच्या आनंदावर विरजण घालणारा ठरू नये म्हणून त्याच्यासाठी गोडाच्या पदार्थांमध्ये थोडे बदल करणे गरजेचे असते. मग मधूमेहींंसाठी गोडाच्या बासुंदीला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी ही खास ‘पायनॅपल बासुंदी’ नक्की करून पहा. नक्की वाचा : या ’5′ टीप्स संगे दिवाळीत मधूमेहीही घेऊ शकतात गोडाच्या पदार्थांचा आस्वाद !

मधूमेहींसाठी बासुंदी करताना लो फॅट दूधाचा वापर करून साखरेला काही पर्याय वापरून पायनॅपल बासुंदी बनवता येते. अनानसाला असणारा खास स्वाद बासुंदीची चव वाढवते त्यासोबतच त्यातून मिळणारे पोषणद्रव्यही तितकेच आरोग्यदायी असते. अननसामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. मात्र त्यातील डाएजेस्टिव्ह एन्झाईम्स मात्र दूध खराब करते. म्हणूनच अननसाचे तुकडे बासुंदीमध्ये मिसळण्याआधी ते शिजवून घ्या. मधूमेहींच्या आहाराबाबतचे दूर करा हे ’6′ गैरसमज !

बासुंदी बनवायला लागणारा वेळ : 15 मिनिटे

शिजवायला लागणारा वेळ : 20मिनिटे

ही बासुंदी 4 जणांसाठी होते

  • साहित्य -:

2 1/2 कप (500 ml) लो फॅट मिल्क  (99.7% fat-free)

दूधात भिजवलेले केशर

1 tbsp गरम लो फॅट दूध  (99.7% fat-free)

1/4 tsp वेलची पावडर

2 tbsp लो फॅट दूधात (99.7% fat-free) 1 tsp कॉर्नफ्लॉवर मिसळा

कपभर खिसलेले / बारीक चिरलेले अननसाचे तुकडे

4 सॅशे (प्रत्येकी 1 ग्राम) पर्यायी साखर

  • कृती
  1. दूध पातेल्यामध्ये ओतून त्याला उकळी येऊ द्यावी.
  2. दूधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये केशराचे दूध, वेलची पावडर आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट मिसळून मिश्रण एकत्र करावे. हे मिश्रण 5-7 मिनिटं उकळून घट्ट होऊ द्यावे. हे उकळलेले दूधाचे मिश्रण थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
  3. नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये अननसाचे तुकडे,पर्यायी साखर, 1 टेबलसपून पाणी मिसळून 2-3 मिनिटे हे मिश्रण उकळा.
  4. यामधील एक टीस्पून अननसाचे तुकडे बाजूला काढून उरलेले मिश्रण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  5. फ्रीजमध्ये ठेवलेले दूधाचे मिश्रण आणि अननसाचे मिश्रण एकत्र करा.
  6. दोन्ही मिश्रण नीट हलवून एकत्र करा. त्यावर अननसाच्या तुकड्यांनी सजावट करून  गारेगार बासुंदी सर्व्ह करा.

बासूंदीप्रमाणेच मधूमेहींसाठी ब्रेकफास्ट ते डेझर्टच्या काही चवदार रेसिपी ! नक्की करून पहा


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>