Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Mammography करण्यापूर्वी जाणून घ्या त्यासंबंधी या ’8′गोष्टी !

$
0
0

भारतीय स्त्रीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर जडण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे सुमारे दर 31 महिलांमागे एकीचा मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरबाबत समाजात जनजागृती तसेच वेळीच त्याचे निदान करता यावे याकरिता सेल्फ ब्रेस्ट एक्झाम करण्याची सवय लावणे गरजेचे आहे. पण काही चाचण्यानंतर किंवा वयाच्या विशिष्ट टप्प्यानंतर प्रत्येक स्त्रीने मॅमोग्राफी करणे आवश्यक असते. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका ओळखता येतो. मात्र त्यापूर्वी कोणत्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे याबाबतचा खास सल्ला Jaypee Hospital and National President, ICanWin Foundation चे Additional Director, Cancer Surgeon, डॉ पवन गुप्ता यांनी दिला आहे.

#1. 40पेक्षा कमी वयाच्या मुलींना मॅमोग्राफी करण्याचा सल्ला सुचवला जात नाही. कारण त्यांच्या वयानुसार स्तनाजवळील टिश्यू नाजूक असतात आणि पांढरसर दिसतात. स्क्रिनिंग टेस्टमध्ये ब्रेस्ट कॅन्सरही पांढरसर रंगाचाच दिसतो  त्यामुळे नेमके निदान करणे कठीण होते. वयाच्या पन्नाशीनंतर ब्रेस्ट कॅन्सर आढळून येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वयाच्या 50-75 दरम्यानच्या स्त्रियांमध्ये मॅमोग्राफी करण्याचा सल्ला सुचवला जातो. ( नक्की वाचा : जाणून घ्या स्त्रीयांच्या स्तनाबद्दल काही आश्चर्यकारक गोष्टी)

#2. तुमच्या घरात पूर्वी ब्रेस्ट कॅन्सर असल्यास, तुमचे वय कमी असल्यास मॅमोग्राफीचा सल्ला दिला जातो. तुम्हांला ब्रेस्ट कॅन्सरची कोणती लक्षण आढळल्यास अशा वेळी मॅमोग्राफीचा सल्ला दिला जातो. अगदी  पंचविशीच्या मुलींमध्ये स्तनाजवळ गाठ, आकारात बदल किंवा पाणी पडत असल्याची लक्षण जाणवत असल्यास मॅमोग्राफीचा सल्ला दिला जातो. ही ’6′ लक्षणं देतात ‘ब्रेस्ट कॅन्सर’चा संकेत ! त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.

#3. ‘स्क्रिनिंग’ आणि ‘डायनॉस्टिक’ अशा दोन प्रकारच्या मॅमोग्राफी असतात. स्क्रिनिंग मॅमोग्राफीमध्ये  केवळ एक्स रे प्रकारे चाचणी केली जाते. प्रामुख्याने चाळीशीच्या पुढील महिलांना सुचवली जाते. ज्यांच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षण दिसत नाहीत. मात्र ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आढळणार्‍या डायनॉस्टिक मॅमोग्राफी सुचवली जाते. ही देखील एक्स रे स्वरूपातील असते.

#4. डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय मॅमोग्राफीचा पर्याय स्वतःहून निवडू नका. तुम्हांला स्तनांमध्ये काही त्रासदायक बदल जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर तुम्हांला तपासून योग्य पर्याय सुचवू शकतात. पण स्त्री शरीरात या ’6′ टप्प्यांवर होतात Breast च्या आकारात बदल 

#5. मासिकपाळीनंतर आठवड्याभराने मॅमोग्राफी करा. मासिकपाळीच्या काळात शरीरात होणार्‍या हार्मोनल बदलांमुळे  स्तन जाडसर होतात. त्यामुळे अधिक वेदना जाणवू शकतात. त्यामूळे किमान मासिकपाळीच्या 3-4 दिवसा नंतरच मॅमोग्राफीसाठी वेळ घ्या.

#7.अनेकदा मॅमोग्राफीच्या दिवशी पावडर किंवा डिओडरंड न वापरण्याचा सल्ला दिला जातो. त्यामधील कॅल्शियम घटकही पांढरे डाग दाखवू शकतात. तसेच गरोदरपणाच्या काळात मॅमोग्राफी करू नका. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्या.

#8 50शीच्या टप्प्यांपुढील स्त्रियांमध्ये मॅमोग्राफीचा सल्ला दिला जातो. कारण या प्रक्रियेमध्ये स्तनांना मॅमोग्राफी  मशिनजवळ नेऊन त्यावर विशिष्ट दाब दिला जातो. ज्यामुळे स्तनांच्या टिश्यूंची स्पष्ट माहिती मिळते. वेदना तीव्र जाणवत असल्यास तेथील व्यक्तीला सांगा. त्यानुसार दाब कमी केला जाईल किंवा अ‍ॅन्गलमध्ये बदल केला जाईल.सुमारे 30 मिनिटांच्या या चाचणीनंतर तुम्ही नियमित काम करू शकता. ब्रेस्ट कॅन्सरशी धैर्याने सामना करण्यासाठी खास ’10′ टीप्स नक्की लक्षात ठेवा.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>