Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सण-समारंभाचाआनंद घेण्यासाठी या ’5′टीप्सने वाढवा तुमची पचनशक्ती !

$
0
0

भारतीय सण-उत्सवांमध्ये चैतन्य,आनंद जितका असतो तितकीच खाण्या-पिण्याची चंगळ असते. विविध सणांमध्ये गोडाचे पदार्थ आवर्जून असतात. त्यामुळे शरीरातील कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण वाढणं सहाजिकच आहे. मग अशावेळी आरोग्य जपत सणांचा आनंद कसा घ्यावा याबाबतचा खास सल्ला GAIA, a brand of healthy products चे डिरेक्टर डॉली कुमार यांनी दिला आहे. सणसमारंभादरम्यान अनहेल्दी पदार्थांचे सेवन वाढल्यास यकृतावर ताण आल्याने पचनक्रिया बिघडते.

  • कॅफिनयुक्त पदार्थ कमी खावेत –  

दिवसभरात दोन कपापेक्षा अधिक कॅफिन शरीरात जाणे त्रासदायक ठरू शकते. यामुळे यकृताद्वारा केली जाणारी डिटॉक्सिफिकेशनची क्रिया पचनक्रिया बिघडवण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे शक्य असल्यास किंवा चहा,कॉफीचा खूप मोह होत असल्यास ग्रीन टी प्या.

  • साखर कमी करा -

अति गोडाचे खाल्ल्याने यकृतावर तणाव येतो. पदार्थातील फ्रुक्टोजचे रूपांतर रक्तातील फॅट्समध्ये होते. त्यामुळे शक्य असल्यास सणा-वाराच्या गोडाच्या पदार्थांमध्ये नैसर्गिक गोडाचे घटक, मध, गूळ यांचा समावेश करा.मधामुळे शरीरात विषारी घटक साचून राहत नाहीत. तसेच पचन सुधारते.

  • दुग्धजन्य पदार्थांचे सेवन नियंत्रणात ठेवा -

योगर्ट वगळता दुग्धजन्य पदार्थांचा आहारातील समावेश वाढवल्यास यकृतामध्ये यकृतावरील विषारी घटकांचा भार वाढून पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे प्रोटीनची गरज भागवण्यासाठी डाळींचाही आहारातील समावेश वाढवा.

  • फायबर्सचा आहारातील समावेश वाढवा -

फायबर्सचा आहारातील समावेश  पचनमार्ग मोकळा करण्यास तसेच यकृतावरील दबाव कमी करण्यास मदत करतात. ओट्सचा आहारात समावेश वाढवा. त्यामध्ये फायबर्ससोबतच प्रोटीन घटकही मुबलक असतात.

  • हलक्या तेलाचा वापर करा -

तीळाचे किंवा व्हेजिटेबल ऑईल जड असते. त्याचा परिणाम यकृतावर होतो.त्याऐवजी ऑलिव्ह ऑईलचा वापर करा यामुळे शरीरात त्याचे ब्रेकडाऊन होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते.

मात्र हे सारे आरोग्यदायी मार्ग निवडले म्हणजे सणाला तुम्ही पदार्थांवर ताव मारणे योग्य नाही. प्रमाणात खाणे हेच योग्य आहे.

Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock

With inputs from IANS


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>