आजकाल बाजारात अनेक प्रकारचे पाव, ब्रेड मिळतात. मूळात पाव मैद्यापासून बनवले जातात त्यामुळे ते अनेक समस्यांना कारणीभूत ठरतात. म्हणूनच व्हिट ब्रेड, मल्टीग्रेन पाव/ ब्रेड उपलब्ध आहेत. पण नेमके आरोग्यदायी पावांचे पर्याय कसे निवडावे हे आहारतज्ञ अन्वेषा शर्मा यांनी दिलेल्या या टीप्सने नक्की जाणून घ्या.
- 100% व्होल ग्रेन असे लेबल पडताळून घ्या -
व्होल ग्रेन ब्रेड हा आरोग्यदायी पर्याय आहे. त्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. त्यामुळे हे घटक त्याच्या पॅकेजिंगवर तपासून पहा. म्हणूनच ‘100% whole grain’ असा उल्लेख तपासून पहा. अनेकदा 50 % व्होल ग्रेन असले तरीही केवळ ‘whole grain’ असे लिहलेले असते.
- अॅडिक्टीव्ह्जचा समावेश -
पावामध्ये आर्टिफिशिअल रंग, फ्लेव्हर्स आणि प्रिझर्व्हेटीव्ह्ज कोणते आहेत हे तपासून पहा. त्याचा कमीत कमी समावेश तितका पाव चांगला. ट्रान्स फॅट्स आणि फ्रुक्टोज कॉर्न सिरप यांचा समावेश अधिक असल्यास त्याचा वापर टाळा. तुम्हांला नेमके त्यामधील घटक समजत नसतील तर गुगलवर तपासून घ्या.
- फायबरयुक्त असावेत -
शरीराला नियमित 25 ग्रॅम फायबर्सची गरज असते. व्होल ग्रेन मधून निम्मे फायबर्स मिळते. योग्य प्रमाणात फायबर्स शरीरात गेल्यास शौचाला सुलभ होते. प्रत्येक स्लाईसमध्ये सुमारे 3 ग्रॅमपेक्षा अधिक फायबर्स असणं आवश्यक आहे.
- अगदीच मऊ किंवा फ्लफी नसावेत -
पाव / ब्रेड अगदिच मऊ नसावा. अनेकदा पावाला मऊ करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. ते आरोग्यास धोकादायक असते. त्यामुळे पावाला/ ब्रेडला थोडे दाबून पहा. त्याचा मऊसरपणा तपासूनच त्याची निवड करा.