Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

टोमॅटो खरचं वाढवते ‘किडनी स्टोन’ची समस्या ?

$
0
0

Read  this  in English

टोमॅटो हे किडनी स्टोनची (मूतखडा) समस्या वाढवण्याचे एक प्रमुख कारण आहे असे समजले जाते.  त्यामुळे अनेकजण आहारातून टोमॅटो व्यर्ज करतात. पण हा एक गैरसमज आहे.( लिंबूपाणी- ‘किडनीस्टोन’ची समस्या दूर करणारा नैसर्गिक उपाय !  )

BLK  या सुपरस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे सिनियर कन्सलटंट डॉ.आदित्य प्रधान, यांच्या मते टोमॅटोमुळे किडनी स्टोनची होतो हा एक गैरसमज आहे. ऑक्सलेट (oxalate) युक्त पदार्थ अधिकप्रमाणात खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याची समस्या वाढते.टोमॅटोमध्ये ऑक्सलेट असले तरीही त्यामुळे  किडनी स्टोन होण्याचा धोका नसतो. भारतीय स्वयंपाकगृहात टोमॅटो प्रामुख्याने वापरला जातो. त्यामुळे दिवसात किलोभर टोमॅटो खाल्ल्याशिवाय तुम्हांला किडनी स्टोन होण्याची शक्यता नसते. त्यामुळे  हा गैरसमज तुमच्या मनातून काढून टाका.

टोमॅटोप्रमाणेच या ‘हे’ पदार्थही तुम्ही बिनधास्त खाऊ शकता 

वांग,दूध देखील किडनीस्टोनची समस्या वाढवत नाही. त्यात कॅल्शियम घटक अधिक असल्याने त्याचा किडनीस्टोनशी संबंध लावला जातो. मात्र यामुळे किडनी स्टोन होण्याची  शक्यता फारच कमी आहे. उलट  शरीरात कॅलिशयम अभाव हे किडनी स्टोनचे एक कारण आहे. त्यामुळे दूध पिणे टाळू नका. किडनीविकारांना दूर ठेवा या ’10′ उपायांनी !

मग कशामुळे  वाढते  किडनीस्टोनची समस्या  ? 

  1. चहा, कॉफी, पालक, सुकामेवा, हवाबंद सॉफ्टड्रिंक्स अशा ऑक्सेलाईटचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ tea, coffee, spinach, nuts and aerated drinks
  2. मासे, लोणची असे खारट पदार्थ तसेच मीठ अतिप्रमाणात खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या वाढते.
  3. लाल मांसमध्ये युरिक अ‍ॅसिड अधिकप्रमाणात आढळल्याने  किडनी स्टोनची समस्या वाढते.
  4. नियमित दीड ते दोन लीटरपेक्षा कमी पाणी प्यायल्यास

म्हणूनच चौकस आहार घ्या आणि  किडनी स्टोनच्या नेमक्या  लक्षणांवर लक्ष ठेवा. म्हणजे त्यावर वेळीच उपाय करणे शक्य होते.


 

छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Translated By  -  Dipali Nevarekar

Sourece  -  Do tomatoes really cause kidney stones?

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी, मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या.


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>