ठाकरे कुटुंबियांचे प्राण्यांवरील प्रेम सर्वश्रुत आहे. मात्र राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंना या घरातील पाळीव कुत्र्यांचा फटका बसला आहे. काल घरातील एका कुत्र्याने चावा घेतल्याने त्यांना 65 टाके पडल्याचे वृत्त समोर आले आहे.
‘बॉन्ड’ नावाच्या पाळीव कुत्र्याला दुपारच्या वेळेस खायला देण्यासाठी शर्मिला ठाकरे गेल्या असताना कुत्र्याने शर्मिला ठाकरेंना चावा घेतल्याचे समजते. दरम्यान शर्मिला ठाकरेंच्या चेहर्याला गंभीर दुखापत झाली असून नुकतीच एक शस्त्रक्रिया पार पडल्याचेही समजते आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या चेहर्यावर 65 टाके पडले आहेत.
‘पग’ आणि ‘जर्मन शेफर्ड’ जातीचे कुत्रे राज ठाकरेंनी घरात पाळले आहेत. ग्रेट डेन जातीचे जेम्स, बॉण्ड आणि शॉन हे तीन कुत्रे आहेत. त्यातील एका कुत्र्याने त्यांच्यावर हा हल्ला केला आहे.
छायाचित्र सौजन्य – IANS / Photo
मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.
तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.