Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

सापाचे विष उतरवायला मदत करतील हे ’4′घरगुती घटक !

$
0
0

आज   नागपंचमी !  सापाला शेतकर्‍याचा मित्र समजला जातो. आजच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. मात्र आजच्या आधुनिक युगात श्रद्धा मागे पडून अंधश्रद्धा पुढे  येत आहेत. मानवी आणि प्राणी जीवनाच्या या संघर्षात अनेकदा मानवी चुकीमुळे वन्यजीव माणसांवर हल्ला करतात. अनेकजण साप चावल्यानंतर त्याला मारून टाकतात. परंतू अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी सापाचे अस्तित्त्व गरजेचे आहे.  मग साप चावल्यानंतर  डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी शरीरात विष पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा.

1) तूप –  

साप चावल्यास 10 -20 तोळं (अर्धा कप) शुद्ध तूप पाजून उलटी करण्याचा प्रयोग केला जातो.  याचबरोबर तूपाचे सेवन केल्यानंतर 10-15  मिनिटांनंतर कोमट पाणी पाजावे. व नंतर उलटी करण्याचा प्रयत्न करावा. यामुळे सापाचे विष शरीराबाहेर पडण्यास मदत होते.

2) तूर डाळ - 

तूरीचे  मूळ चावून  खाल्ल्याने सापाचे विष उतरण्यास मदत होते.

3) लसूण- 

सापाने  दंश केला असल्यास, त्यावर लसूण वाटून लावावा. किंवा लसणाच्या रसात मध घालून चाटायला दिल्यास त्वरित फायदा होतो. (लसणामध्ये दडले आहेत 5 सौंदर्यवर्धक गुणधर्म !!)

4) करटोली - 

करटोलीच्या ज्या झाडाला फळं येत नाही. त्याला ‘वांझ करटोली’ म्हणतात. अशा करटोल्याचा कंद पाण्यात उगाळून पाजल्याने तसेच सापाच्या दंशावर त्याचा लेप लावल्याने सर्पदंशात फायदा होतो. या उपायामुळे विषारी जीवजंतूचा नाश होण्यास मदत होते.

  • लक्षात ठेवा 

हा केवळ घरगुती उपाय आहे. यामुळे विष पसरण्याची तीव्रता कमी होण्यास मदत होते. केवळ या उपायावर अवलंबून न राहता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


 

संदर्भ- ‘आहार हेच औषध’ -माधव  चौधरी

छायाचित्र सौजन्य – shutterstock

मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या. तसेच आमच्या ‘फेसबुक’ पेज व ‘ट्विटर’ हॅन्डललाही नक्की लाईक करा.

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांना प्रख्यात डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवण्यासाठी आमच्या ‘फोरम‘ ला भेट द्या आणि तुमचे थेट प्रश्न विचारा.

 


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles