कानामध्ये मळ जमा होण्याचा त्रास अनेकांमध्ये असतो. पण वरकरणी फारशी त्रासदायक किंवा वेदनादायक न वाटणारा त्रास खरंच दुर्लक्षित केला तर चालेल का ? असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच Apollo Spectra Hospitals चे सिनियर कन्सल्टंट डॉ अशीम देसाई यांनी दिलेला हा खास सल्ला नक्की जाणून घ्या आणि तुमच्या मनातील हे ’10′ प्रश्न दूर करा.
1.किती दिवसांनी कान स्वच्छ करावेत ?
कानामध्ये मळ साचायला सुरवात झाली की कान स्वच्छ करणे आवश्यक आहे. मात्र नियमित किंवा आठवड्यातून दोनदा कान स्वच्छ केल्याने कानात दाह किंवा शुष्कपणाचा त्रास वाढू शकतो.
2.कान स्वच्छ करण्याची योग्य पद्धत कोणती ?
कानाचा बाहेरील भाग सुती आणि मऊ कापडाने स्वच्छ करा. तर कानाच्या आतील भाग बेबी ऑईल, एअर ड्रॉप किंवा मिनरल ऑईलचे थेंब टाकून स्वच्छ करावेत.
3.कोणत्या परिस्थितीमध्ये विशेष लक्ष देणं गरजेचे असते?
कानामध्ये तीव्र वेदना जाणवत असल्यास, ऐकण्यामध्ये त्रास जाणवत असल्यास, कानामध्ये विशिष्ट आवाज वाजत राहत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा , ENT स्पेशॅलिस्टचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
4.कानात मळ जमा होणं सामान्य आहे का ?
सौम्य प्रमाणात कानात मळ साचणं हे अगदी सामान्य आहे. कानाला स्वच्छ करण्याची ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कानातील मळ अॅन्टीबॅक्टेरियल असून ते एक ल्युबरिकंट आहे.
5.कानातला मळ साफ करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?
कानातला मळ साफ करण्यासाठी अनेकजण पिन, बोटं किंवा इअर बडचा वापर करतात. टोकदार वस्तूंचा वापर केल्याने कानाचे नुकसान होऊ शकते. इजा होण्याचा धोका असतो. तर कापसाच्या बोळाने मळ अधिक खाली ढकलला जातो. त्यामुळे ऐकू येण्याची क्षमता अजून कमी होते.
6.कानातील मळ कोणत्या आजाराचे संकेत देते का ?
कानातील मळ कोणत्याच आजाराचे संकेत नाही. उलट यामुळे कान स्वच्छ होत असल्याचे संकेत मिळतात. मात्र वारंवार मळ जमा होत असल्यास किंवा एखादे तेल त्रासदायक ठरत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
7.अतिरिक्त प्रमाणात जमा होणारा मळ कसा टाळावा ?
मळ थांबवण्यासाठी कोणतेही उपाय नाही. मात्र हा त्रास वारंवार जाणवत असल्यास किंवा त्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्यास सतत कान साफ करायची सवय कमी करा. विशिष्ट कालांतराने कान स्वच्छ करा.
8.चुकीच्या पद्धतीने कान स्वच्छ करण्याची सवय त्रासदायक ठरू शकते का ?
कान साफ करण्यासाठी चूकीच्या वस्तूचा वापर केल्यास नक्कीच त्यामुळे कानाचे नुकसान होते. कानात वेदना, सूज,कमी ऐकू ऐकण्याची समस्या वाढते.
9.ear candles चा वापर करणे योग्य आहे का ?
इअर कॅन्डल्सचा वापर करून कान स्वच्छ होतात. असा अनेकांचा समज आहे. परंतू हा सुरक्षित पर्याय नाही. यामुळे गंभीर स्वरूपाचे नुकसान होऊ शकते.
10.कानातील सारा मळ काढणे गरजेचे आहे का ?
कानातील केवळ अतिरिक्त मळ काढून टाकणे गरजेचे असते. अतिरिक्त मळ काढण्यासाठी ते विरघळवणारे काही इअर ड्रॉप्स बाजारात उपालब्ध आहेत. त्याचा वापर करावा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock