वजन घटवण्याच्या मिशनवर असताना भूकेवर नियंत्रण मिळवणं हे सर्वाधिक आव्हानात्मक असते. वजन घटवण्याच्या नादामध्ये कमीत कमी कॅलरीयुक्त खाण्याच्या प्रयत्नामध्ये उपास मार केली जाते. त्यातून अधिक खाल्ले गेल्यास वजन वाढते आणि परिणाम उलटतो. म्हणूनच भूकेवर सकारात्मक पद्धतीने मात कशी करावी हे जाणून घेण्यासाठी आहारतज्ञ अन्वेषा शर्मा यांनी दिलेला सल्ला नक्की जाणून घ्या.
- प्रोटीन्सचा आहारातील समावेश वाढवा -
तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्सचा समावेश वाढवा. यामुळे आहार पोटभरीचा होतो तसेच त्यातील अमायनो अॅसिड भूक नियमित ठेवण्यासाठी मदत होते. त्यासाठी अख्या डाळी, मासे, अंडी, यांचा आहारातील समावेश वाढवा.
- आरोग्यदायी फॅट्सचा आहारातील समावेश वाढवा -
आरोग्यदायी आहाराचं प्लॅनिंग करताना फॅटयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश कमी केला जातो. परंतू फॅट्समुळेच भूकेवर नियंत्रण राहते तसेच पोटभर राहते. फॅट्समधून उर्जा मिळते. तसेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचे शोषण सुधारते. पेशींना मजबूत बनवते. त्यामुळे बदाम, अॅव्हॅकॅडो, मासे, ऑलिव्ह ऑईल यांचा आहारात समावेश करा.
- आहारातील फायबर्सचा समावेश वाढवा -
पचन कार्याला नियमित करण्यासाठी फायबर्स महत्त्वाची भूमिका पार पाडते. त्यामुळे पाण्याचा अंश टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच आहारात हिरव्या भाज्यांचा,फळांचा समावेश वाढवा. त्यामध्ये कॅलरीजही योग्य प्रमाणात आढळतात. सलाड किंवा फळं खाण्याच्या सवयीमधून शरीराला फायबर्सही मिळतात.
- भूक लागल्यासारखे वाटल्यास च्युईंग गम चघळा-
वेळी अवेळी लागणार्या भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी च्युईंग गम चघळणे हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे. यामुळे वजन कमी होत नसले तरीही कमीत कमी कॅलरीज शरीरात जातात. मात्र च्युईंगगम हे शुगर फ्री असेल याची काळजी घ्या.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock