Quantcast
Channel: » Marathi
Viewing all articles
Browse latest Browse all 1563

नवरात्री विशेष : नवरंगांनी सेट करा तुमचा परफेक्ट मूड !

$
0
0

आजपासून नवरात्रीतील नवरंगांची धूम सुरू होतेय. नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर ‍! गेल्या काही वर्षांपासून या नऊ दिवसांत सार्‍यांनी एका दिवशी समान रंग परिधान करण्याची संकल्पना पुढे आली आहे. यामागे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व नसले तरीही रंगांचा आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. रंग़ हे भावना व्यक्त करणारे एक अबोल आणि परिणामकारक माध्यम आहे.  मग रंगांसोबत या सणाची अधिकाधिक मजा लूटण्यासाठी या नऊ  दिवसात नऊ रंग तुम्हीही फॉलो करून पहा.( नवरात्रीत सौंदर्य खुलवण्यार्‍या शेहनाज हुसेनच्या खास मेकअप टीप्स ! )

कसा होतो रंगांचा परिणाम ? 

आजूबाजूच्या परिसरातील कोणतीही वस्तू पाहिल्यानंतर मेंदूला एक विशिष्ट संदेश दिला जातो. तसेच प्रत्येक रंगांचा आपल्यावर फिजीकल, फिजियालॉजिकल आणि सायकोलॉजिकल परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक रंग पाहिल्यानंतर आपल्या मनात काही विशिष्ट भावना उत्तेजित होतात. त्यानुसार आपले मन त्याला प्रतिसाद देते. ज्याला आपण ‘मूड’ म्हणतो.

लाल रंग - 

लाल हा प्रामुख्याने प्रेमाशी निगडीत रंग आहे. पण त्याचबरोबर  उर्जादायी आणि शरीराला चालना देण्यासही मदत करतो. सभोवतालच्या लोकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा ठोस आणि महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही लाल रंग वापरू शकता. उष्ण स्वरूपातील या रंगामुळे लाल रंग घातलेली व्यक्ती ही कळत-नकळत रागीट वाटण्याचीही शक्यता आहे.

पिवळा -

मन प्रसन्न आणि संतुलित करण्यासाठी पिवळा रंग मद्त करतो. मनावरील मरगळ आणि दडपशाही कमी करण्यास मदत होते. पिवळा हा आशादायी आणि मनाला नवी उभारी देतो. तसेच या रंगामुळे चंचलता, समीक्षक वृत्तीचादेखील प्रसार होण्याची शक्यता असते.

नारंगी -

 

नारंगीदेखील प्रेमाचा रंग  समजला जातो. हा रंग फारसा गंभीरतेकडे नसून तर मजा-मस्तीकडे झुकणारा रंग आहे. नारंगी रंगामध्ये उर्जा असते. त्यामुळे प्रखरतेचे दर्शन या रंगातून होते. लाल किंवा पिवळ्या रंगापेक्षा नारंगी हा अधिक प्रेरणादायी आहे. हा रंग अ‍ॅन्टीडीप्रेसंट ( निराशा कमी करणारा) असून मन प्रसन्न करायला मदत करतो.

हिरवा -

हिरवा रंग शांत आणि डोळ्यांना अल्हाददायक आहे. यामुळे ताण कमी होण्यास तसेच मनाची शांतता वाढण्यास मदत होते. यामुळे नैसर्गिकरित्या समतोल राखण्यास मदत होते. हिरव्या रंगामुळे नवी उर्जा प्रज्वलित होऊन सख्य वाढण्यास मदत होते. रंगचक्रातील हा दुसरा सर्वात आवडता रंग़ आहे. हिरवा रंग विश्वास, एकात्मता आणि आशांचे प्रतिक आहे.  या रंगामुळे तुमचे एकमेकांवर अवलंबून राहण्याची क्षमता सुधारते.

गुलाबी –

मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय असणारा हा रंग सौंदर्य आणि निष्पापतेचे प्रतिक आहे. अतिशय सौम्य प्रवृत्तीचा हा रंग अस्सल प्रेम व्यक्त करण्यास मदत करतो. लाल हा पॅशनेट प्रेमाचे प्रतिक आहे. तर गुलाबी अधिक नितळपणे भावना व्यक्त करण्यास मदत करते.

निळा –

रक्तदाबाची समस्या कमी करण्यासाठी निळा रंग अतिशय फायदेशीर आहे. अतिउत्साही लोकांमध्ये स्थिरता आणण्यासाठी हा रंग मदत करतो. या रंगाच्या मानसिक परिणामामुळे भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. तसेच निळ्या रंगामुळे शांतत, मानसिक आरोग्य आणि स्थिरता सुधारण्यास मदत होते.

जांभळा -

जांभळा रंग मनाची स्थिरता सुधारण्यास तसेच भीतीवर मात करण्यास मदत होते. राजेशाही थाट  असणारा हा रंग गर्दीत उठून दिसण्यास मदत करतो.

राखाडी - 

राखाडी रंग हा क्रिएटीव्ह  क्षमतेचा प्रसार करतो. मानसिक तटस्थता राखण्यास हा रंग मदत करतो.  या रंगामुळे आत्मविश्वास कमी होण्यास तसेच निराशा वाढण्यास मदत होते.

काळा -

अनेक मंगलप्रसंगात हा रंग टाळला जातो. पण मानसिक सुरक्षा आणि ग्लॅमरचे प्रतिनिधित्त्व करणारा हा रंग कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतो.

पांढरा –  

निर्मळता, सच्चेपणा यांचं प्रतिक म्हणजे पांढरा शुभ्र रंग.  साधेपणा, विचारांची स्थिर बैठक  यांचे प्रतिनिधित्त्व करणारा हा रंग तुम्हांला शांतप्रिय  करायला मदत करेल.

रंगांचा प्रत्येकावर होणारा परिणाम हा व्यक्ती सापेक्ष असला तरीही त्यामध्ये काही सकारात्मक आणि नकारात्मक गुणधर्म दडले आहेत. त्यामुळे परिस्थितीनुसार योग्य रंगाच्या वस्तू, कपडे निवडा  आणि रंगबेरंगी निसर्गातून स्वतःसोबतच इतरांचे जीवनही अधिक समृद्ध बनवा.

रंगांच्या मदतीने काही आजारही दूर करता येतात. मग आरोग्य सुधारणारी  ‘कलर थेरपी’  देखील नक्की पहा.

संबंधित दुवे- 

नवरात्रीचे उपवास नक्की करा, पण या ‘हेल्दी’ मार्गाने !

 

 Read this in Hindi.

संदर्भ -

Ahmed, Sadaf, and Saima Khan. “COLOR PERCEIVING; A PSYCHOPHYSIOLOGICAL BASIS OF COLORS.”

Escalating Research Volume 3 Issue


Viewing all articles
Browse latest Browse all 1563

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>