आजकाल लांब आणि जड झुमके, कानातले घालण्याची फॅशन आहे. हाय हिल्स, पिअर्सिंगसारख्या फॅशन सेगमेंट्स प्रमाणेच मोठे कानातले घातल्याने आरोग्यावर परिणाम होतो. जड कानातल्यां मुळे कानाच्या पाळीला त्रास होतो. तेथील नाजूक त्वचा खाली येऊन त्वचा फाटण्याची ही शक्यता असते. जखम लहान स्वरूपात असल्यास आपोआपच भरते. मात्र मोठ्या प्रमाणात त्वचेचे नुकसान झाल्यास काय उपचार करावेत याबाबतचा सल्ला Apollo Spectra Hospitals, Mumbai चे ई एन टी स्पेशॅलिस्ट अशिम देसाई यां नी दिला आहे.
कानाची त्वचा संवेदनशील होऊन त्यात दाह, पस किंवा खाज जाणवत असल्यास डॉ क्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू करणे गरजेचे आहेत. त्वचेचे नुकसान फार प्रमाणात झाले असल्यास त्यावर शस्त्रक्रिया केली जाते. (नक्की वाचा : 15 मिनिटांत कानदुखी दूर करणारा घरगुती उपाय)
लहान स्वरूपाची जखम असल्यास वेळे नुसार ती भरून निघते. तसेच दिवसतून 2-3 वे ळेस मॉईश्चरा यझर लावल्यास जखम भरण्यास मदत होते. तसेच त्वचेचे अजून नु कसान होण्यापासून तुमचा बचाव होतो. या दिवसांमध्ये कानातले घालणे टाळा. सुमारे 3-4 आठवड्यां मध्ये हा त्रास कमी हो ण्यास मदत होते. जखम तीव्र स्वरूपाची असल्यास त्यावर वैद्यकीय उपचार करणे गरजेचे आहे. शस्त्रक्रियां मध्ये इंजेक्टेबल फिलर्सच्या मदतीने जखमेवर उपचार केले जातात. पस किंवा त्रास कमी करण्यासाठी स्टिरॉईड इं जेक्शनस चा वापर केला जातो. उपचारांप्रमाणेच वेळीच काळजी घेणेदेखील आवश्यक असते. म्हणूनच एखाद्या समारंभामध्ये लांब, जड किंवा मोठे कानातले घालणार असल्यास थोडी विशेष काळजी अवश्य घ्यावी. स्टाईलच्या या ’5′ नादात तुमचे आरोग्य धोक्यात येतयं ! हे तुम्हांला ठाऊक आहे का ?
- तुम्ही घातलेल्या कपड्यांमध्ये अडकतील असे कानातले घालू नका. त्याकानातल्यां मुळे कानाची पाळी खाली खे चली जाते. परिणामी कानाचे छि द्र मो ठं हो ण्याची किं वा कान फाटण्याची शक्यता असते.
- लहान मुलांना सां भाळत असल्यास लोंबते कानातले घालणे टाळा. लहान मुलांना कानातले खे चण्याची सवय असते. त्यामुळेही कान फाटू शकतो.
- सहा महिन्याच्या काळापेक्षा कमी वेळामध्ये पु न्हा पु न्हा कान टोचू नका. किं वा इअर पिअर्सिंग करू नका. जखम भरण्यास वेळ द्या. त्यावरच पुन्हा छि द्र करू नका.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock