प्रामुख्याने अरेन्ज्ड मॅरेजमध्ये किंवा पहिल्यांदा डेट गेल्यावर दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांसमोर आल्यानंतर नेमके काय बोलावे? कुठून सुरवात करावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. मग अशा वेळी तुम्हांला अस्वस्थ करणारी ती विचित्र शांतता मोडून एकमेकांना अधिक चांगल्याप्रकारे ओळखून घेण्यासाठी नेमके कोणते प्रश्न विचारावेत असा विचार मनात असेल तर हे ’7′ प्रश्न तुम्हांला नक्कीच मदत करतील.
1.तुमचं ध्येय किंवा स्वप्न काय आहे ?
तुमच्या समोर असलेली व्यक्ती पोटापाण्यासाठी काय करते हे तुम्हांला माहित असेलच मग त्यातून पुढे जाताना नेमकी त्याची ध्येय, आशा, अपेक्षा काय आहेत हे जाणून घ्या. जर तो पुढील शिक्षणासाठी परदेशामध्ये जाणार असेल तर त्यानुसार तुम्ही लॉंग़ डिसडंट रिलेशनशिप जपण्याबाबत निर्णय घेऊ शकता.
2.तुम्ही कधीही पाहू शकाल असा सिनेमा किंवा वाचू शकाल असे पुस्तक कोणते ?
तुमचा दिवस कसा होता ? किंवा तुमचा छंद काय असे नेहमीचे विशिष्ट प्रश्न विचारण्याऐवजी त्यांना थेट प्रश्न विचारा. कोणत्या पुस्तकाचा, कलाकृतीचा त्यांच्या आयुष्यावर प्रभाव आहे का ? असे विचारा. या प्रश्नामुळे त्यांच्या विचारांची, आवडीनिवडीचा साधारण अंदाज लावणे शक्य होते. कदाचित एखाद्या पुस्तकावर किंवा सिनेमावर तुमचे एकमत झाल्यास तो तुमचा सोलमेट असण्याचीही शक्यता असू शकते. मग त्यावर तुम्ही खूपवेळ बोलू शकता.
3.तुम्ही कशाबद्दल पॅशनेट आहात का ?
कदाचित एखाद्या व्यक्तीचे प्रोफेशन आणि पॅशन हे वेगवेगळे असू शकते. पैशासाठी किंवा अॅकॅडमिक कारणांमुळे काहीवेळेस प्रोफेशन विशिष्ट निवडले जाते. मात्र खरी ओढ किंवा कामातून वेळ मिळाल्यानंतर ती व्यक्ती अन्यच कोणत्यातरी कामात व्यग्र असू शकते. त्यामध्ये त्यांना अधिक आनंद मिळत असतो. म्हणूनच त्यांच्या अशा हटके आवडीबद्दलही माहिती करून घ्या.
4.तुमच्या पालकांच्या किंवा भावंडांशी तुमचे अगदी घट्ट बंध आहेत का ?
तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात त्यांचे इतरांशी, घरातल्या व्यक्तींशी असलेले नातेसंबंध देखील जाणून घेणे आवश्यक आहे. ‘मम्माज बॉय’ मुलांशी सांभाळून घेताना थोडा जास्त संयम ठेवणे गरजेचे असते.
5.शालेय जीवन कसे होते?
शालेय जीवनात समोरची व्यक्ती कशी होती हे देखील नक्की जाणून घ्या. काही मुलं खूपच दंगेखोर तर काही मितभाषी असतात. त्यानुसार त्यांचे मित्र ठरतात. त्यांच्या मित्रपरिवाराचाही आयुष्यातील अनेक गोष्टींवर परिणाम होतो.
6.तुम्हांला कशाचे व्यसन आहे का?
आयुष्याच्या कमजोर टप्प्यावर धुम्रपान, मद्यपान किंवा इतर व्यसनांची मदत घ्यावीशी वाटत असणारी व्यक्ती वेळीच पारखून घ्यावी. यामुळे भविष्यात संकंट ओढावून घेण्याआधीच त्याना टाळणे फायदेशीर ठरते.
7.बिल विभागून देऊ का?
डेटवर गेल्यावर प्रामुख्याने मुलगा खाण्याचे बिल देतो. मात्र तुम्हांला तो खरंच आवडला असल्यास किंवा पुन्हा डेटवर जाण्याची इच्छा असल्यास या वेळेस तुम्ही बील भरा आणि पुढल्यावेळेस त्याला भरू द्याची विनंती करा. म्हणजे अप्रत्यक्षपणे पुढील भेटही निश्चित होईल. किंवा अर्धे अर्धे बील भरून विषय संपवा.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock