शरीरात इस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यास वजन वाढण्यापासून इन्फर्लिटीच्या समस्येपासून कॅन्सरचा धोका संभवतो. हा त्रास अनेक कारणांमुळे वाढतो. मात्र त्याची सुधारण्यासाठी योगाभ्यासही फायदेशीर ठरतो. म्हणूनच बाळासाठी प्रयत्न करत असल्यास आहारात बदल करण्यासोबतच ही काही योगासनं करण्याचा सल्ला योगा एक्सपर्ट रमण मिश्रा करतात.
पश्चिमोत्तासन :
या आसनामुळे शरीरात इस्ट्रोजन या हार्मोन्सच्या निर्मितीला चालना मिळते.
कसे कराल पश्चिमोत्तासन :
- दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवून जमिनीवर ताठ बसावे.
- श्वास घेऊन दोन्ही हात वर करा आणि श्वास सोडत दोन्ही हात पायांजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा.
- हाताचे कोपरे जमिनीवर टेकवत कपाळ गुडघ्यावर ठेवा.
- या आसनामध्ये 10-20 सेकंद बसा. पुन्हा मूळ स्थितीमध्ये या. हे आसन 5-6 वेळेस केल्यास फायदा होईल.
जानू शीर्षासन :
या आसनामुळे इस्ट्रोजनला चालना मिळते. तसेच थायरॉईड, किडनीचे विकार आटोक्यात ठेवण्यास मदत होते. स्वादूपिंडाला चालना मिळाल्याने रक्तातील साखरही नियंत्रणात राहते.
कसे कराल जानू शीर्षासन -
- जमिनीवर पाय ताठ पसरून बसा. एक पाय दुमडा आणि दुसरा सरळ रेषेत ठेवा.
- सरळ रेषेत ठेवलेल्या पायाचा अंगठा दोन्ही हातांनी धरा.
- हळूहळू हाताचे कोपरे जमिनीवर टेकवा. त्यानंतर कपाळ पायांवर टेकवा.
- सुमारे 1-3 मिनिटे या आसनामध्ये बसा.