सेक्स हे केवळ लैंगिक सुख नसून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेदेखील आहेए. मात्र लग्नापूर्वी पुरेशी काळजी न घेता सेक्स केल्याने काही आजारांचा धोका वाढतो त्याप्रमाणेच अनावश्यक गर्भधारणेचाही धोका असतो. अशावेळी अनेकदा स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात. मात्र त्याचा वापर किती दिवसांचा फरकाने करावा ते कितपत आरोग्यदायी आहे? तसेच त्याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ञ उमा वैद्यनाथन यांनी दिलेला हा सल्ला नक्की जाणून घ्या.
मेडिकल स्टोअरमध्ये मॉर्निंग़ आफ्टर पिल सहज उपलब्ध असते. कोणत्याही प्रिस्क्रिब्शनशिवाय त्याची विक्री केली जाते. त्यामुळे सेक्स करताना सुरक्षेची काळजी घेतली नसल्यास त्या संबंधांनंतर पहिल्या 72 तासामध्ये गोळी घ्यावी. यामुळे अनावश्यक गर्भधारणा टाळण्यास मदत होते. मात्र त्याचा परिणाम पहिल्या 24 तासांमाध्ये 95 % दिसण्याची शक्यता असते अशी सुचना डॉक्टरांकडूनही दिली जाते.
असुरक्षित संबंधांनंतर जितका अधिक वेळ वाया जाईल तितका गोळीचा प्रभाव कमी होतो. 72 तासांनंतर गर्भनिरोधक गोळ्या काहीच प्रभावी ठरू शकत नाहीत. म्हणूनच गर्भनिरोधक गोळ्यांबाबत या काही इंटरेस्टिंग गोष्टीदेखील जाणून घ्या. डॉ. वैद्यनाथन यांच्या सल्ल्यानुसार, मॉर्निंग पिल्स केवळ आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतल्या जातात. जसे की, सेक्सदरम्यान कंडोम फाटल्यास किंवा सरकल्यास इमरजन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या घेतल्या जातात.
मग अशा इमरजन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या किती वेळाने किंवा कितपत घेणे सुरक्षित आहेत ?
मासिकपाळीच्या एका चक्रामध्ये एकदाच इमरजन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या घेणे सुरक्षित आहे. मासिकपाळी चक्राच्या मध्यावर गोळ्या अधिक परिणामकारक ठरतात. एकापेक्षा अधिक वेळा घेतल्यास पुढील मासिकपाळीच्या चक्रामध्ये अनियमितता तयार होते. परिणामी पुढच्या टप्प्यांवर मासिकपाळीचे चक्र बिघडल्याने अनावश्यक गर्भधारणेचीही शक्यता वाढते. असा सल्ला डॉ. वैद्यनाथन देतात.
Read this in English
Translated By – Dipali Nevarekar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock